BJP MLA cousin death : दिवाळीतच भाजपच्या महिला आमदाराच्या भावाची हत्या; काँग्रेस नेते अमोल दीक्षित यांच्यावर संशयाची सूई...

UP BJP MLA Archana Pandey, Anuj Kumar Chaturvedi, Kannauj murder case : अर्चना पांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. भावाची हत्या झाल्याचे समजताच आमदार पांडे यांना अश्रू अनावर झाले.
BJP MLA Archana Pandey’s cousin Anuj Kumar Chaturvedi was shot dead in Uttar Pradesh’s Kannauj district on Diwali night. Police have launched a search for the main accused.
BJP MLA Archana Pandey’s cousin Anuj Kumar Chaturvedi was shot dead in Uttar Pradesh’s Kannauj district on Diwali night. Police have launched a search for the main accused.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Uttar Pradesh crime news देशभरात दिवाळीचा उत्साहात साजरी होत असतानाच उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात थरारक घटना घडली आहे. दिवाळीच्या रात्रीच भाजपच्या महिला आमदाराच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. निवडणुकीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या जिल्हा महासचिवांवर याप्रकरणी आरोप केले जात आहेत.

भाजपच्या आमदार अर्चना पांडे यांचे चुलत बंधू आणि प्रसिध्द विधिज्ञ अनुज कुमार चतुर्वेदी यांची हत्या झाली आहे. काँग्रेसचे जिल्हा महासचिव अमोल दीक्षित हे मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. ते घटना घडल्यापासून फरार आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच टीम तयार केल्या आहेत. रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हत्येमागे निवडणूक आणि जमिनीचा वाद असल्याचे कारण सांगितले जात आहे. अनुज कुमार यांचे बंधू धीरज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल दीक्षित याचे अनुज सोबत भांडण झाले होते. त्याच्या थोबाडीत मारण्यात आली होती. त्यावरून वाद वाढत गेला आणि अमूलने आपल्याकडील पिस्तूलातून अनुजवर चार गोळ्या झाडल्या.

BJP MLA Archana Pandey’s cousin Anuj Kumar Chaturvedi was shot dead in Uttar Pradesh’s Kannauj district on Diwali night. Police have launched a search for the main accused.
NCP merger news : शरद पवारांची भेट अन् विलीनीकरणाच्या चर्चांवर पटेल पहिल्यांदाच बोलले; 10 नोव्हेंबरनंतर काय होणार?

धिबरामऊ पोलीस चौकीजवळच हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अनुजला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना घडताच अर्चना पांडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. भावाची हत्या झाल्याचे समजताच आमदार पांडे यांना अश्रू अनावर झाले.

BJP MLA Archana Pandey’s cousin Anuj Kumar Chaturvedi was shot dead in Uttar Pradesh’s Kannauj district on Diwali night. Police have launched a search for the main accused.
PM Modi news : मुख्यमंत्री फडणवीस यांची 'ही' कृती मनाला स्पर्श करणारी! PM मोदींना दिवाळीत कोणती गोष्ट भावली?

एकीकडे दिवाळीचा उत्साह असतानाच आमदार पांडे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपी अमोल दीक्षित याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राज्याचे राजकारणही तापण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.