Amit Shah, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi - Amit Shah : मविआची 'ती' चूक; भाजपने घेतली 'ही' काळजी; मुख्यमंत्री ठरवतानाच दावेदारांना...

Sudesh Mitkar

Madhya Pradesh : मध्य प्रदेशात निर्णायक बहुमत मिळाल्यानंतर देखील भाजपने मुख्यमंत्री ठरवण्यासाठी तब्बल सात दिवस घेतले. आणि मोहन यादव या नव्या चेहऱ्याला संधी दिली. तर ज्यावरुन महारा मुख्यमंत्री पदांच्या रेसमध्ये असणाऱ्या नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा सभापतीपदी संधी देण्यात आली. असंच काही छत्तीसगडमध्ये करण्यात आले आहे. यामागे भाजपाची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा नाना पटोले यांना विधानसभेचे सभापती करण्यात आले होते. नंतर पटोले यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी अवसानघातकी ठरला. त्यामुळे जो घटनात्मक पेचप्रसंग झाले त्याचा फायदा शिंदे- फडणवीस सरकारला झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापासून बोध घेत मोदी आणि अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या अनुभवी चेहऱ्यांना छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात विधानसभा अध्यक्षपदाचा मान दिला आहे. यातून त्यांच्या अनुभवाचाही मान ठेवला आहे आणि नाराजी होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना भाजप नेतृत्वाने मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ते २४४६१ मतांनी विजयी झाले आहेत.

नरेंद्र सिंह तोमर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. यावेळी पक्षाने त्यांना केंद्रातून राज्यात निवडणूक लढवण्यासाठी पाठवले होते. त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ज्या चेहऱ्यांवर मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यात नरेंद्र सिंह तोमर यांच्या नावाचाही समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT