H. D. Kumaraswamy : पन्नासहून अधिक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार पडणार ?

'Operation Lotus' in Karnataka to begin soon : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते कुमारस्वामी यांनी केला दावा  
Karnataka News
Karnataka NewsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : छत्तीसगड पाठोपाठ आता राजस्थान आणि मध्य प्रदेशातही नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, तर दुसरीकडे दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात राजकीय पेच पुन्हा वाढणार असल्याचे दावे केले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकार फार काळ टिकणार नसून ते लवकरच पडेल, असा दावा केला आहे. तसेच राज्यातील एक प्रभावशाली मंत्री 50 हून अधिक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.  

महाराष्ट्रात जे घडले तसेच इथेही घडू शकते

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी रविवारी हा मोठा दावा केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कधीही पडू शकते. कॉग्रेसच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली आहे. त्यांच्या सोबत 50 ते 60 आमदार पक्ष बदलू शकतात. केंद्राने त्यांच्यावर दाखल केलेल्या 'केस'मधून सुटण्यासाठी ते हा निर्णय घेऊ शकतात. असा दावा करताना एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. यावेळी ते महाराष्ट्रात जे घडले तसेच इथेही घडू शकते. असे हि म्हणाले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karnataka News
Cricketnama 2023 : 'जे काम इतर कोणी करू शकले नाही ते "क्रिकेटनामाने" केले'...

विधानसभेत काय परिस्थिती आहे?

या वर्षी मे महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १३५ जागा मिळाल्या होत्या. भाजपला 66 तर जेडीएसकडे 19 जागा आहेत. विधानसभेतील बहुमताचा आकडा 113 जागांचा आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. यानंतर काँग्रेसचे सरकार गमवावे लागले, मात्र यावेळी आमदारांची संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त आहे. 

अशा स्थितीत पक्षात एवढी मोठी फूट पडेल याबद्दल थोडी शंका आहे. सरकारला सध्या 135 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, मात्र महाराष्ट्राचा हवाला देत जनता दल सेक्युलरचे नेते आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सरकार पडणार असल्याचा दावा करून राजकारण नक्कीच तापवले आहे.

Karnataka News
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग की मृत्यूचा सापळा ? महामार्गावर तब्बल इतके मृत्यू ....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com