karnataka elections2023 Sarkarnama
देश

Karnataka Elections 2023 : भाजपने दुसऱ्या यादीतही माजी मुख्यमंत्री शेट्टार यांना डावलले ; येदियुरप्पांचे पक्षश्रेष्ठींकडे साकडे

BJP releases second list of candidates for karnataka elections2023 : येदियुरप्पा यांनी शेट्टार यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घातलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

BJP releases second list of candidates for karnataka elections2023 : कर्नाटक विधानसभेसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी काल रात्री (बुधवारी) जाहीर केली. मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १८९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती, दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे नाव दुसऱ्या यादीतही नसल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाराज असलेल्या शेट्टार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी शेट्टार यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घातलं आहे.

मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय महासचिव व कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांनी पहिली यादी जाहीर केली होती. यात भाजपने ५२ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ११ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे.उमेदवारी जाहीर यादी करण्यापूर्वी भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या चार बैठका झाल्या होत्या.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगांव विधानसभा मतदार संघातून लढणार आहेत. आतापर्यंत २१३ उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत ९ डाँक्टर, ३१ पदवीधर, ६ वकील दोन सनदी अधिकारी, तीन सेवानिवृत्ती अधिकारी, आठ महिलांचा समावेश आहे. अनिल कुमार यांच्यासह भास्कर राव हे दुसरे माजी सनदी अधिकारी निवडणूक रिंगणात आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत ३२ ओबीसी उमेदवार, ३० अनुसूचित जाती (SC) उमेदवारा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर १६ अनुसूचित जनजातीचे (ST) उमेदवार आहेत. कर्नाटक सरकारचे मंत्री आर अशोक हे दोन जागांवर नशिब अजामवत आहेत. ते पद्दनाभनगर आणि कनकपुरा येथून लढत आहेत. कनकपुरा येथून ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके के शिवकुमार यांच्या विरोधात लढत नाही.

गेल्या महिनाभरात भाजपमधून बंडखोरी करून 16 नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना बंडखोरी ग्रासत आहे.राज्यात सत्ताविरोधी लाट असून, काँग्रेस सत्तेत येण्याचे संकेत मतदानपूर्व चाचणीत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसचे सरकार निश्चित आहे, असे समजणार्‍या अनेक दिग्गजांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक आता बंडखोरीची भाषा करू लागले आहेत.

गेल्या महिनाभरात भाजपमधून बंडखोरी करून 16 नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना बंडखोरी ग्रासत आहे.राज्यात सत्ताविरोधी लाट असून, काँग्रेस सत्तेत येण्याचे संकेत मतदानपूर्व चाचणीत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसचे सरकार निश्चित आहे, असे समजणार्‍या अनेक दिग्गजांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक आता बंडखोरीची भाषा करू लागले आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT