Vasundhara Raje Sarkarnama
देश

BJP In Rajasthan : भाजपचं राजस्थानमध्ये चाललंय काय! वसुंधरा राजेंकडे दुर्लक्ष...

Vasundhara Raje News : राजस्थानमध्ये दोन समित्यांची निवड; ३१ उमेदवारांची यादी जाहीर

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : कर्नाटकमधील उमेदवार निवडीबाबत झालेली चूक भाजपने राजस्थानमध्ये सुधारल्याची दिसून येत आहे. तीन महिन्यांवर आलेल्या राजस्थान, छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या नसतानाही भाजपने उमेदवारांची यादी घोषीत केली आहे. यातून आगामी निवडणुका होणाऱ्या राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भाजपने राज्य निवडणूक व्यवस्थापन आणि जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. यातील एकाही समितीत पक्षाने मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना स्थान दिलेले नाही. यामुळे भाजप वसुंधरा राजेंना वगळून राजस्थानमध्ये कुठला राजकीय 'फॉर्म्युला' तयार करणार, याकडे देशाचे लक्ष आहे. (Latest Political News)

भाजपतर्फे निवडणूक समित्यांची नावे जाहीर करण्यासंदर्भात गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रदेश प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी हे दोघेही उपस्थित होते. निवडणूक व्यवस्थापन समितीची जबाबदारी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष नारायण पंचारिया यांच्याकडे दिली आहे. निवडणूक जाहीरनामा बनवणाऱ्या समितीची कमान केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपला मजबूत करणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा या दोन्ही समित्यांमध्ये समावेश केला नाही. तसेच इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही वगळल्याचे दिसून येत आहे. परिणामी भाजप या नेत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा देशभर सुरू झाली आहे.

राजस्थानपूर्वी, भाजपने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसाठी राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचीही घोषणा केली. या समित्यांमध्ये मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वसुंधरा राजेंबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. त्यांना दोन समित्यांमध्ये स्थान न देण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर भाजपनेही स्पष्टीकरण दिले. वसुंधरा राजे हे नावाजलेले नेते आणि राजस्थानातील मोठा चेहरा आहे. त्याच्यासाठी आणखी एक भूमिका आहे. त्यामुळे अशा समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्याची गरज नाही.

वसुंधरा राजे या राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्याने त्यांना दुसरी जबाबदारी दिली जाईल, असे भाजपकडून सांगितले जात आहे. मात्र मध्यप्रदेशातही निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून तीचे नेतृत्व मोठे नेते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

राजस्थानच्या निवडणूक जाहीरनामा समितीची जबाबदारी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे दिलेली आहे. तर राज्य निवडणूक व्यवस्थापनासाठी समितीचे समन्वयक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नारायण पंचारिया यांच्याकडे जाबाबदारी दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT