Mumbai News : माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरेंनी पत्नीसह आत्महत्या केली. तत्पुर्वी त्यांनी एक 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करून मानसिक छळ करणाऱ्या लोकांची नावे सांगितली होती. नावे सांगूनही पोलीस कारवाई करत नाहीत, याच्या निषेधार्थ नंदकुमार यांचे बंधू धनंजय ननावरेंनी आपल्या हताचे एक बोट तोडले. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी चौघांना अटक केली. यात शिंदे गटातील एका आमदाराच्या 'पीए'चाही सहभाग आहे. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (Latest Political News)
ननावरे दाम्पत्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास राजकीय 'कनेक्शन' असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शशिकांत साठे, कमलेश निकम, नरेश गायकवाड, गणपती रामा कांबळे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चौघांनाही २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने तीन आठवड्यांपूर्वी उल्हासनगरमधील घराच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक 'व्हिडिओ रेकॉर्ड' करून ठेवला होता. त्यात त्यांनी आपला मानसिक छळ करणाऱ्यांची नावे सांगितली होती. मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई केलेली नव्हती.
याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नंदकुमार यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी आपल्या शरीराचा एक भाग दर आठवड्याला तोडून देणार असल्याचा 'व्हिडिओ' शुक्रवारी व्हायरल केला. तसेच ऑन कॅमेरा त्यांनी आपल्या हाताचे एक बोट तोडून फडणवीसांना पाठवणार असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याची चर्चा आहे.
नंदकुमार ननावरे यांनी पत्नी उज्वला यांच्यासह आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरेंनी मोबाईलमध्ये 'व्हिडीओ रेकॉर्ड' केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. ननावरेंनी हा 'व्हिडीओ' पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व त्यांच्या निवडक सहकाऱ्यांना पाठवला होता. तसेच आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिट्ठीही मिळाली होती.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.