Prime Minister Narendra Modi Sarkarnama
देश

PM Modi In Parliament: भाजप सर्व रेकॉर्ड तोडून 2024 ला पुन्हा सत्ता काबीज करणार; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Prime Minister Narendra Modi: "अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदींनी पहिल्या दहा मिनिटांमध्येच विरोधकांवर जोरदार पलटवार केला.

सरकारनामा ब्युुरो

Delhi News:  मोदी-शाहांना रोखण्यासाठी विरोधकांनी कबंर कसली असून देशभरात 'इंडिया'मजबूत करण्यासाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत 'इंडिया' मोदींच्या राजकारणाला हद्दपार करणार असल्याचा विश्वासही विरोधी पक्ष बोलून दाखवत आहेत.

पण या विरोधकांचे सत्तेचे स्वप्न उधळून लावणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत जाहीरच करून टाकले. "गेल्या निवडणुकीत 'एनडीए' आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. आता 2024 च्या निवडणुकीत देखील 'एनडीए' आणि भाजप आधीचे सर्व रेकॉर्ड तोडून पुन्हा येणार आहे", असेही स्पष्ट केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदी-शाहा विरोधकांना जड जाणार आहेत.

"विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या दहा मिनिटामध्येच विरोधकांवर जोरदार पलटवार केला. देशातील जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवला. त्यांचे आभार मानन्यासाठी मी इथे उभा आहे", असे ते म्हणाले.

"2018 ला देखील अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. तेव्हा मी म्हटले होते, हा प्रस्ताव आमच्या सरकारची 'फ्लोअर टेस्ट' नाही. आताही विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून तो प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे", असे म्हणत मोदींनी विरोधकांना खोचक टोला लगावला.

विरोधकांच्या एका-एका शब्दाला देश ऐकत असून प्रत्येक वेळी देशातील जनतेची विरोधक निराशा करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी काही दिले नाही. जेंव्हा अविश्वास प्रस्ताव येतो, तेव्हा विरोधी पक्षनेता बोलतो. पण अधीर रंजन चौधरींना त्यांनी यावेळी संधी दिली नाही", असे सांगत मोदींनी टिकास्त्र सोडले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT