Asaduddin Owaisi In Loksabha : देशात चौकीदार अन् दुकानदार; ओवैसींचा मोदींसह राहुल गांधींवर निशाणा

Asaduddin Owaisi On Narendra Modi : 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकाला चांगलेच धारेवर धरले.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi Sarkarnama

Delhi News: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर संसदेत चर्चा सुरू असून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरकीडे सत्ताधाऱ्यांकडून सरकारची बाजू संसदेत मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. असे असतानाच 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

"मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना, मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याचे सांगत, देशात द्वेषाचे वातावरण असून मणिपूरमध्ये निरपराध लोकांचे बळी जात असल्याचे सांगत या देशात चौकीदार आहे आणि दुकानदार आहेत", असा शब्दात ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींवर टिकास्त्र सोडले.

Asaduddin Owaisi
Congress On Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या रुपाने नीरव मोदी भारतातच! अधीर रंजन चौधरींच्या विधानाने भाजप आक्रमक

मणिपूरात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे, असे असतानाही तेथील मुख्यमंत्र्यांना का हटवले नाही?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला. याबरोबरच दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये एका'आरपीएफ'च्या जवानाने चार जणांची हत्या केल्याच्या घटनेकडेही ओवैसींनी सरकारचे लक्ष वेधले.

Asaduddin Owaisi
Amit Shah In Loksabha : काश्मीरला हिंसाचारमुक्त केले, सात राज्यातील नक्षलवादही संपवला; अमित शाहांचा दावा

काँग्रेसकडून 2019 च्या निवडणुकीदरम्यान चौकीदार चोर आहे, अशी टीका मोदींवर करण्यात येत होती. यावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. तर आता खासदार असदुद्दीन ओवैसींनी देशात चौकीदार आणि दुकानदार आहेत, असे म्हणत मोदींसह राहुल गांधींवर टिकास्त्र सोडल्यामळे पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com