yogendra yadav  Sarkarnama
देश

Yogendra yadav News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार इतक्या जागा; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले आहे. पाचव्या टप्यासाठी उद्या मतदान होणार आहे. आतापर्यंत जवळपास लोकसभेच्या 380 जागांवर मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदानानंतर प्रत्येक पक्ष वेगवेगळे दावे करून स्वतःला मजबूत असल्याचे सांगत आहेत. एकीकडे भाजप 400 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. दरम्यान, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्यासह अनेक विश्लेषकही भाजपच्या जागांचा अंदाज वर्तवला आहे.

चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप (Bjp) 400 पार करण्याची घोषणा देत आहे, तर काँग्रेससह (Congress) संपूर्ण विरोधक मोदी सरकारचे जाणे निश्चित असल्याचे सांगत आहेत. अशा स्थितीत योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांचा दावा विरोधकांना खूष करून भाजपची चिंता वाढवू शकतो, असाच आहे. (Yogendra yadav News)

राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या मते, भाजप 2019 पेक्षा मोठा विजय मिळवेल, असा त्यांचा दावा आहे, पण तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. मी देशातील जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. निकाल आल्यावर भाजप 250 पेक्षा कमी जागा जिंकेल. संपूर्ण एनडीए एकत्र झाल्यास 265 जागांवर पोहोचेल.

येत्या काळात एनडीए सत्तेत येणार नाही. मला वाटते की त्यांना बहुमत सिद्ध करणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांना बहुमताजवळ पोहचणे अडचणीचे ठरणार आहे, असेही योगेंद्र यादव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सर्वांचेच 4 जूनला होणाऱ्या निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागांवरील निकालावरच बरेचसे काही अवलंबून असणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

SCROLL FOR NEXT