BJP  Sarkarnama
देश

Telangana Assembly: भाजपचे दक्षिण भारतातील विजयाचे स्वप्न अधुरे; पण कामगिरी दमदार !

Sachin Waghmare

Telangana Assembly Elections Results in Marathi : तेलंगण येथील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने यश संपादन केले आहे. त्यांनी भारत राष्ट्र समितीची दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. या दक्षिण भारतातील तेलंगण राज्यात भाजपने (bjp)केवळ आठ जागांवर विजय मिळवला असला, तरी १८ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेस व भारत राष्ट्र समितीमध्ये झालेल्या सरळ लढतीत या पक्षाच्या यशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीत विशेष म्हणजे, ज्या १८ ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तेथील विजयी पक्ष पाहता, १३ ठिकाणी भारत राष्ट्र समितीने (BRS) विजय मिळवला आहे. तीन ठिकाणी काँग्रेस आणि दोन ठिकाणी एमआयएमने विजय मिळवला आहे.भाजपने ज्या ८ ठिकाणी विजय मिळवला आहे, तिथे सहा ठिकाणी भारत राष्ट्र समिती दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दोन ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या ठिकाणी आहे.

राज्यातील ही निवडणूक खरे तर भारत राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस अशीच होती. तरीही या निवडणुकीत भाजपने विजय मिळविलेल्या ८ पैकी सहा जागांवर भारत राष्ट्र समिती पराभूत झाल्याने आणि ज्या १८ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यापैकी १३ मतदारसंघात भारत राष्ट्र समितीने विजय मिळवला आहे. त्यामुळे, राज्यातील १९ मतदारसंघांतील लढत ही भारत राष्ट्र समिती विरुद्ध भाजप अशीच होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या असल्या, तरी त्या दक्षिण भारतात मिळवल्या आहेत. १८ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे चित्र पाहता, राज्यातील भाजपच्या या ताकदीकडे कोणत्याही पक्षाला दुर्लक्ष करून चालणार नाही.त्यासोबतच एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत. परंतु, एकाही मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर नाही. त्यामुळे भाजप व एमआयएमच्या यशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT