Delhi Vidhan Sabha Election  Sarkarnama
देश

BJP strategy 2025 : भाजप ‘आप’चा खेळ बिघडवण्याठी सज्ज, देशाची राजधानी जिंकण्याची रणनीती आज ठरणार

Delhi Vidhan Sabha Election 2025 : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेवर विविध योजनांचा भडिमार करत गेल्या काही दिवसांत 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता आपच्या (AAP) रणनीतींचा सामना करण्यासाठी भाजपनेही तयारी सुरु केली आहे.

Rashmi Mane

दिल्ली विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. 2013 पासून दिल्लीच्या राजकारणात सत्ता असणाऱ्या 'आप'ने आता विजयाच्या हॅटट्रिकची तयारी केली आहे. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेवर विविध योजनांचा भडिमार करत गेल्या काही दिवसांत 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत.

आता आपच्या (AAP) रणनीतीचा सामना करण्यासाठी भाजपनेही तयारी सुरु केली आहे. त्यासाठी आज (शनिवार) दिल्ली भाजप कार्यालयात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, प्रदेश संघटन सरचिटणीस पवन राणा, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि निवडणूक प्रभारी जयपंडा दिल्ली भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला दिल्लीचे सर्व खासदारही उपस्थित राहणार आहेत. दिल्ली भाजप अध्यक्ष म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे.

या बैठकीत निवडणूक जाहीरनाम्यावर चर्चा

दिल्ली भाजपने (BJP) अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तसेच आम आदमी पक्षाच्या घोषणांचा प्रतिकार करण्यासाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, भाजप प्रत्येक वर्गासाठी काहीतरी खास आणणार असल्याचे सातत्याने सांगत आहे. या सर्व बाबींवर या बैठकीत विशेष चर्चा होईल तसेच महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणे हे मोठे आव्हान

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणे हे भाजपसाठी मोठे आव्हान आहे. सध्या आप दिल्लीतील जनतेसाठी सातत्याने मोठ्या घोषणा करत आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असून या बैठकीनंतर भाजपही लवकरच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT