Blood from Kumaraswamys Nose Sarkarnama
देश

H. D. Kumaraswamy News : ...अन् भर पत्रकारपरिषदेत केंद्रीयमंत्री कुमारस्वामींच्या नाकातून येवू लागलं रक्त!

Mayur Ratnaparkhe

Karnataka Political News : केंद्रीयमंत्री एचडी कुमारस्वामींच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. कुमारस्वामी हे रविवारी बंगळुरुमध्ये भाजप-जेडीएस नेत्यांच्या एका बैठकीनंतर पत्रकारपरिषदेत बोलत होते, तेव्हा अचानक त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं, रक्ताचे थेंब त्यांच्या पांढऱ्या शर्टवरही पडले, त्यामुळे एकच गोंधळ उडला आणि त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पत्रकारपरिषदेत अचानक नाकामधून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कुमारस्वामींनी(H. D. Kumaraswamy) नाकाला रुमाल धरून तो थांबवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी रक्ताचे थेंब त्यांच्या शर्टवरही पडले. नाकातून रक्त नेमकं कशामुळे आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र कुमारस्वामींना रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपाचर करत आहे आणि रक्तस्त्रावाचं कारण शोधत आहेत.

पत्रकारपरिषदेच्या आधी भाजप(BJP) आध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक झाली. या दरम्यान कर्नाटकात म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण(एमयूडीआय) घोटाळ्यासह अनेक भ्रष्टाचार प्रकरणांवर चर्चा झाली.

बैठकीनंतर विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस(Congress) सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप करत म्हटले की, राज्याच्या काँग्रेस सरकारने जनजाती समुदायास लुटलं आहे. त्यांनी पुढे म्हटले की दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडीयुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होतील. ही सात दिवसीय यात्रा आहे जी 3 ऑगस्ट रोजी सुरू होईल आणि 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते 10 ऑगस्ट रोजी हजर राहतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT