Revanth Reddy : रेवंथ रेड्डी ओवेसींच्या भावाला काँग्रेसमध्ये आणणार? विधानसभेत केलं मोठं विधान...

Akbaruddin Owaisi AIMIM Congress : विकासकामांच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना रेवंथ रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांना ऑफर दिली.
Akbaruddin Owaisi, Revanth Reddy
Akbaruddin Owaisi, Revanth ReddySarkarnama
Published on
Updated on

Telangana : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या एक ऑफर सध्या राज्याच्या राजकारणात भलतीच चर्चेत आली आहे. त्यांनी थेट एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. थेट विधानसभेतच उघडपणे रेड्डी यांनी हे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

तेलंगणा विधानसभेत शनिवारी मेट्रोच्या मुद्यावर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान रेड्डी आणि ओवेसी यांच्यामध्ये तिखट संवाद झाला. हैद्राबादचा विकास, मेट्रो सेवा, कायदा सुव्यवस्था आदी मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना रेड्डी म्हणाले, माझे मित्राने आपल्या जुन्या मित्राला १० वर्षे दिली. मला फक्त चार वर्षे द्यावीत, असे रेड्डी म्हणाले.

Akbaruddin Owaisi, Revanth Reddy
Nishant Kumar : वडील 18 वर्षे मुख्यमंत्री, मुलगा राजकारणापासून कोसो दूर! का होतेय पिता-पुत्राची चर्चा?

जुन्या शहरामध्ये सेवांचा विस्तार करणे माझी जबाबदारी आहे. मी योजना पूर्ण केल्यानंतरच मेट्रोतून मते मागायला येईन, असेही रेड्डी म्हणाले. तसेच त्यांनी चंद्रायनगुट्टा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी अकबरुद्दीन ओवेसींचा पाठिंबा मागितला. विशेष म्हणजे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्तव ओवेसी करतात.

काँग्रेसच्या उमेदवाराचा चंद्रयानगुट्टामध्ये विजय झाल्यास ओवेसींचे काय होणार, असा सवाल एका आमदारांनी सभागृहातच चर्चेदरम्यान केला. त्यावर रेड्डी यांनी गुगली टाकली. ओवेसी यांनी कोडंगल मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवावी. त्यांच्या विजयाची जबाबदारी मी घेतो. एवढेच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या शेजारी बसवेन, असेही रेड्डी म्हणाले.

Akbaruddin Owaisi, Revanth Reddy
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा; नितीशबाबू, लालूंना ‘दे धक्का’

कोडंगल मतदारसंघातूनच रेड्डी विजयी झाले आहेत. ओवेसींसाठी ही जागा सोडेन, त्यांचा अर्ज मीच दाखल करेन, असे विधानही रेड्डी यांनी केले. रेड्डी यांची ही ऑफर ओवेसी यांनी सपशेल नाकारली. माझा राजकीय प्रवास एमआयएममध्ये सुरू झाला, वाढला आणि एमआयएममध्ये संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com