Twitter News  Sarkarnama
देश

Breaking News : राहुल गांधी,योगी आदित्यनाथ,अजित पवार यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवली; काय आहे कारण?

Elon Musk News : ब्लू टिक हटवलेल्यांमध्ये 'या' सेलेब्रिटींचा समावेश....

Deepak Kulkarni

Twitter Blue Tick Removed : जगभरासह भारतातीलही अनेक राजकीय नेतेमंडळी, खेळाडू, बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह विविध सेलेब्रिटींच्या अकाऊंटसमोर इतके दिवस ब्लू टिक पाहायला मिळत होती. तसेच सर्वसामान्य मंडळींतही ब्लू टिकची प्रचंड क्रेझ असल्याचंही दिसत होतं. मात्र,आता ब्लू टिक प्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने राहुल गांधी,अजित पवार यांच्यासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्यासह अनेक सेलेब्रिटींच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवली आहे.

ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk)यांनी 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. यानंतर 20 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अनेक महत्वाच्या नेतेमंडळींसह, अभिनेते, खेळाडूंच्या ब्लू टिक काढून टाकल्या आहेत.

ब्लू टिक काढलेल्यामध्ये 'या' सेलेब्रिटींचा समावेश

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढलेल्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाना पटोले, नितेश राणे यांच्यासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन , शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली,महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

याचवेळी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक जणांची ब्ल्यू टिक कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहे कारण?

ज्यांनी ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाली होती. त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. आता फक्त ब्लू टिकसाठी पैसे खर्च करुन मासिक योजना घेतील त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस कुणाची ब्ल्यू टिक कायम

ब्लू टिकसाठी किती पैसे मोजावे लागणार?

ब्लू टिक(Twitter Blue Tick) हवी असेल किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक कायम ठेवायची असेल तर एखाद्या युझरला सभासदस्यत्व घ्यावे लागणार आहे. याआधी ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरु होते. मोबाईल युझरसाठी ते दरमहा 900 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT