Sunstroke Deaths : नितीन करीरांना उगाच बदनाम का करावे, ते सरकारच्या चुकीची चौकशी करतील का? ; राष्ट्रवादीचा सवाल

Maharashtra Bhushan Award Ceremony Inquiry Committee : नितीन करीर हे करु शकतील का ?
 Maharashtra Bhushan Award Ceremony NEWS update
Maharashtra Bhushan Award Ceremony NEWS updateSarkarnama
Published on
Updated on

Inquiry committee maharashtra bhushan award ceremony : खारघर (Kharghar) परिसरात सोळा एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एक सदस्यीय समिती नेमली.

मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीरयांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी होईल. नितीन करीर हे या हे समितीचे एकमेव सदस्य असतील. ही समिती घटनेची वस्तुस्थिती तपासेल आणि अशा कार्यांचे आयोजन करताना काय पावले उचलायला हवी याबाबत शिफारस करतील.

मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या या समितील राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे, असे म्हटलं आहे. " नितीन करीर यांच्यामार्फत चौकशी करण्यापेक्षा चौकशी न केलेलीच बरी. उगाच IAS अधिका-यांना का बदनाम करावे," असे आव्हाड यांचे मत आहे.

 Maharashtra Bhushan Award Ceremony NEWS update
Maharashtra Government : गावकारभाऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठा दिलासा ; वर्षभरात सादर करा..

निरुपनकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 14 जणांचा उष्माघाताने (Sunstroke Deaths) मृत्यू झाला. त्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती.

खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. या सदस्याचे नाव नितीन करीर आहेत, जे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, अत्यंत हुशार आणि कायद्याच्या चौकटीबाहेर न जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पण, सरकारच्याच हाताने झालेली चूक आणि त्याची चौकशी ते कसे काय करु शकतील, याबद्दल मात्र शंका आहे. यामध्ये सरकारकडून झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या हे नितीन करीर हे करु शकतील का ? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे,

 Maharashtra Bhushan Award Ceremony NEWS update
Modi Government : मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ गिफ्ट मिळणार ; पगारात होणार इतकी वाढ

जितेंद्र आव्हाड म्हणतात...

नितीन करीर यांच्या कामांबद्दल महाराष्ट्रातील कुठल्याच राजकारणी व्यक्तीच्या मनात शंका नाही, पण जर चौकशीच करायची असेल आणि महाराष्ट्राला सत्य कळूच द्यायचे असेल, तर उच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे.

नितीन करीर यांच्यामार्फत चौकशी करण्यापेक्षा चौकशी न केलेलीच बरी. उगाच IAS अधिका-यांना का बदनाम करावे. नितीन करीर ह्यांची कारकिर्द निष्कलंक आहे, त्यांनी ही जबाबदारी ज्या मुळे बदनाम होण्याची शक्यता आहे, ती नाकारावी कारण इतिहास या गोष्टीसाठी आता कोणालाच माफ करणार नाही. महाराष्ट्राला सत्य कळलेच पाहिजे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com