CM Pramod Sawant | Poultry  Sarkarnama
देश

Poultry Crisis in Goa : गोव्यात उद्भवला 'बॉयलर चिकन' तुटवड्याचा प्रश्न, आता महाराष्ट्रातील 'हा' आमदार घालणार लक्ष!

Boiler chicken shortage in Goa : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेवून केली चर्चा; जाणून घ्या, नेमके कोण आहेत हे आमदार?

Mayur Ratnaparkhe

Goa News: गोव्यात निर्माण झालेल्या बॉयलर चिकन तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील आमदाराने पुढाकार घेतला आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून चिकनचा तुटवडा निर्माण झाला असून, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

याप्रकरणी आता चंदगड, कोल्हापुरचे आमदार शिवाजी पाटील यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेऊन बॉयलर चिकन तुटवड्यावर चर्चा केली. चिकन तुटवड्याबाबत लवकरच महाराष्ट्र आणि गोवा पोल्ट्री असोसिएशनची बैठक होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

डिचोलीसह राज्‍याच्‍या अन्य भागांत कर्नाटक व महाराष्‍ट्रातून (Maharashtra) बॉयलर कोंबड्यांची आवक होत असते. पण, आवक बंद झाल्याने राज्यात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोव्यात प्रवेश करताना लागणाऱ्या चेकनाक्यावर ज्यादा पैशांची मागणी करून वाहतूकदारांची कोंडी करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे वाहतूकदार संतप्त झाले असून, ते संपावर गेले आहेत. यामुळे बॉयलर कोंबड्यांची आवक बंद झाल्याने राज्यात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवक कमी झाल्यामुळे बॉयलर चिकनच्या दरातही अचानक ३० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

त्‍यामुळे हा दर आता प्रतिकिलो १८० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकरणात आता आमदार शिवाजी पाटील यांनी लक्ष घालण्याचे ठरवल्याने गोव्यातील चिकन तुटवड्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT