
Goa BJP MLA Jeet Arolkar : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि मयेचे आमदार पेमेंद्र शेट यांच्यासोबत दिल्ली दौरा केला होता. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना घेऊन जैसलमेर मार्गे चार्टरद्वारे दिल्ली गाठली होती. फेरबदलाच्या चर्चांना ऊत आले असताना या दौऱ्याने खळबळ निर्माण झाली होती. शिवाय यानंतर लगेच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, फेरबदलाला अद्याप मूहूर्त लागलेला नाही.
गोव्यात(GOA) मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही आमदारांना घेऊन डिसेंबरमध्ये दिल्ली दौरा केला होता. या आमदारांपैकी कोणालातरी मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी जोरदार चर्चा सुरु झाली. या आमदारांमध्ये उपस्थित असलेल्या मांद्रेच्या आमदारांनी पहिल्यांदाच आता याप्रकरणी भाष्य केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यात सहभागी असलेल्या आमदार जीत आरोलकरांनी मंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 'मंत्रिपदाची मला इच्छा नाही. मला त्याबाबत काही अधिकृत माहिती मिळाल्यास मी त्यावर भाष्य करेन. पण, सध्यातरी असे काही नाही. मी तिथे खूश आहे आणि कामही व्यवस्थित सुरु आहे', असे आमदार आरोलकर म्हणाले.
'आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. भविष्यातील कामे, युवकांच्या कामावर मी सध्या माझे लक्ष आहे. बाकीच्या कोणत्याही विषयावर लक्ष विचलित करण्याची माझी इच्छा नाही. माझे शुभचिंतक माझे कार्यकर्ते माझ्या कामावर खूश आहेत. येत्या दोन वर्षात विकास काय असतो हे तुम्हाला दिसेल', असे आरोलकर पुढे म्हणाले.
मंत्रिमंडळ फेरबदल आत्ताच होणार नाही, असे मत सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनी मांडल्याने मतामुळे फेरबदलाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत. दरम्यान, फेब्रुवारीतील हिवाळी अधिवेशन उरकल्यानंतर फेरबदल होणार का? असे मत राजकीय तज्ञ मांडत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.