Narendra Modi Sarkarnama
देश

Boycott Maldives : मोदींचा अपमान सहन करणार नाही; मालदीवची टूरच रद्द, साऊथच्या अभिनेत्याचा 'अँग्री' रोल

Sunil Balasaheb Dhumal

Maldives Vs Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांची तंतरली. त्यांनी मोदींवर काही आक्षेपार्ह टिप्पणी केली. यानंतर मालदीव आणि भारताच्या संबंधात तणाव निर्माण झाला. यानंतर अनेक नेत्यांसह अभिनेत्यांनीही मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकला. यात आता दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांचीही भर पडली आहे.

याबाबत नागार्जुन यांनी ट्विट करून आपण मालदीवची टूर कॅन्सल करीत असल्याची माहिती दिली. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) अपमान करणाऱ्या देशात जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. नागार्जुन म्हणाले, 'मी कुणालाही घाबरत नाही. मात्र मी मालदीवची ट्रीप कॅन्सल करतो. कारण मालदीवच्या नेत्यांनी आपल्या पंतप्रधान मोदींबाबत जे वक्तव्य केले आहे, ते बरोबर नाही. नरेंद्र मोदी १४० कोटी लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा अपमान सहन करू शकत नाही.'

भारताच्या सेलिब्रिटींनी केलेल्या बहिष्कारामुळे मालदीवच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. यावर बोलताना नागार्जुन म्हणाले, 'लक्षद्वीप हे ट्रीपसाठी चांगले ठिकाण आहे. मालदीव आपल्या कर्माची फळे भोगत आहे.' भारताच्या नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे. त्यांनी भारताला इशाराही दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना, चिनी पर्यटकांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात यावे, असेही आवाहन केले आहे. चीन दौऱ्यानंतर मुइझू यांनी भारताविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी भारताला मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलावण्याची मुदतच दिली. भारताने १५ मार्चपर्यंत आपले सैन्य माघारी घेण्याचे आवाहन केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT