Vijay Shivtare : आता माझ्या प्रचाराला अजितदादा येतील; शिवतारेंचा कॉन्फिडन्स, पुरंदरचं गणित काय सांगतं ?

Purandar Vidhansabha : राज्यात त्रिदेव एकत्र लढले, तर महायुती 48 जागाही जिंकेल.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे राजकीय राज्यातील अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील गणिते बदलली आहेत. त्यातच माजी आमदार विजय शिवतारे आणि पवारांच्या वादामुळे पुरंदर विधानसभेबाबत चर्चांना उधाण आले.

अजित पवार पुरंदरमध्ये आमदार संजय जगताप की शिवतारे यापैकी कुणाला साथ देणार, असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यावर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी उत्तर दिले आहे. 'विधानसभेसाठी पुरंदर शिवसेनेकडे असल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळेल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Vijay Shivtare
Sambhajiraje : लोकसभेला संभाजीराजेंना आघाडीचे पाठबळ? कोल्हापूरसाठी असा आहे मास्टर प्लॅन...

अजित पवारांचा कामाचा झपाटा, त्यांचे शब्द पाळणे आणि चॅलेंजचा शिवतारे यांना चांगलाच अनुभव आहे. २०१९ मध्ये शिवतारे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी अजित पवारांनी प्रत्युत्तर देताना शिवतारे कसे निवडून येतात, तेच पाहतो, असे खुले चॅलेंज दिले होते. त्यानंतर शिवतारेंचा पराभव झाला आणि काँग्रेसचे संजय जगताप आमदार झाले.

त्या निवडणुकीनंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. मात्र पवार महायुतीत दाखल होताच शिवतारेंनी पवारांशी जुळते घेतले. आता महायुती धर्मातून शिवतारे अजितदादांची स्तुती करताना थकत नसल्याचे दिसून येत आहे. 'लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेत अजितदादाच आपल्या प्रचाराला येतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचवल्या आहेत.

Vijay Shivtare
Uddhav Thackeray : 'मातोश्री'बाहेर घातपाताची शक्यता; बंदोबस्तात वाढ, पोलिसांकडे नेमकी माहिती काय ?

विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, 'अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने माझी कुठलीही अडचण होणार नाही. उलट दादा माझ्या प्रचाराला येणार आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस असेल. त्यामुळे ही सीट शिवसेनेची असल्याने दादा माझ्या प्रचाराला येतील. आता कुणी महाविकास आघाडीत आले आणि गेले तरी काही फरक पडणार नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, बारामती लोकसभेतून शिवतारेंची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. यावर ते म्हणाले, 'आता महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यांच्याकडे लोकसभेसाठी क्षमतेचे अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे माझा प्रश्न येतच नाही. राजकारणात लोकसभा लढवण्याची इच्छा असते. मात्र आता नाही. याउपरही अजितदादा (Ajit Pawar) म्हणाले, की तुला लोकसभा लढवायची आहे, तर मी तयार आहे.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतात. राज्यात सध्या त्रिदेव काम करीत आहेत. त्यांना सुपर चाणक्य असलेल्या फडणवीसांची साथ आहे. हे त्रिदेव एकत्र लढले, तर राज्यातील सर्व ४८ जागाही महायुती जिंकेल,' असा विश्वासही शिवतारेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Vijay Shivtare
Rashmi Thackeray : आता रश्मी ठाकरेही प्रचाराच्या मैदानात, पहिल्यांदाच निघणार 'स्त्रीशक्ती संवाद' यात्रा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com