Brij Bhushan Sharan Singh News Sarkarnama
देश

Brij Bhushan Sharan Singh News : ब्रिजभूषण सिंहांना डबल झटका; एकीकडे आरोप निश्चिती होणार अन् पक्षही तिकीट कापणार?

Lok Sabha Elecction 2024 : दिल्ली न्यायालयाने खासदार सिंह यांची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत त्यांनी आपल्यावरील आरोपांवर कोणत्याही निर्णयापर्यंत न येता, अजूनही चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

Chetan Zadpe

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतीय महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी आता खासदार ब्रिजभूषण शरण सिंह मोठा धक्का बसला आहे. दिल्ली न्यायालयाने खासदार सिंह यांची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत त्यांनी आपल्यावरील आरोपांवर कोणत्याही निर्णयापर्यंत न येता, अजूनही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अशा परिस्थितीत आता लैंगिक शोषण प्रकरणात निकालापर्यंत येण्याचा आणि आरोप निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या राजकीय आणि निवडणुकीतील महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवण्यावर बंधने येऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी किंवा मुलाला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशा स्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर आता ब्रिजभूषण शरण सिंह यांचेही तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. नुकतेच उमेदवारीच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, 'प्रभू रामाची जी इच्छा असेल ते होईल.' अद्याप निवडणुकीवर निर्णय घेतला नसून, ज्याला मैदानात उतरवले जाईल तो मोठा विजय मिळवेल, असेही ते म्हणाले. 'ज्याला मैदानात उतरवले जाईल' या त्यांच्या विधानाचा अर्थ असा की, आता त्यांच्याशिवाय कुटुंबातील सदस्याला निवडणुकीत उभं करण्याच्या पर्यायाची ते चाचपणी करत आहेत. (Lok Sabha News)

18 एप्रिललाच निर्णय येणार होता -

राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या न्यायामूर्ती प्रियंका राजपूत यांच्या न्यायालयाने सांगितले की, 'आता ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर आरोप निश्चित करण्याचा निर्णय ७ मे रोजी घेतला जाईल.' पण याचा निर्णय 18 एप्रिलला येणार होता. परंतु ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या वतीने या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात यावी, अशी याचना करण्यात आली होती. त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, आता त्यांचा अर्ज फेटाळण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालय निकाल देणार -

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यात पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या सुनावणीत ब्रिजभूषण यांनी आपल्यावर लावण्यात आलेले लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT