BJP leader news : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना वाढदिवसानिमित्त अनोखे गिफ्ट मिळाले आहे. त्यांची लेक शालिनी सिंह यांनी नोएडा येथे एक हेलिपॅडची उभारणी करत वडिलांना ते गिफ्ट म्हणून दिले होते. खुद्द बृजभूषण सिंह यांच्याच हस्ते या हेलिपॅडचे उद्घाटनही करण्यात आले.
वडिलांचा वाढदिवस स्वप्नवत व्हावा, यासाठी शालिनी सिंह यांनी दिलेल्या या खास गिफ्टची देशभर चर्चा होत आहे. अशाप्रकारे थेट हेलिपॅड गिफ्ट देण्याचा हा पहिलाच प्रकार असावा, अशी चर्चा रंगली आहे. वडिलांविषयी प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी शालिनी सिंह यांच्या या गिफ्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
शालिनी सिंह याही वडिलांप्रमाणेच भाजपमध्ये सक्रीय आहेत. त्या एक कार्यकर्त्या म्हणून पक्षाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच नोएडा सिटीशन फोरच्या कार्यकारी अध्यक्षाही आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उत्तर प्रदेशातील गौतमबुध्द नगरमधील एका विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
बृजभूषण हे भाजपचे मातब्बर नेते मानले जातात. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांची काही दिवसांपूर्वीच निर्दोष मुक्तता झाली आहे. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यावेळीही शालिनी सिंह यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून चर्चेत होते. वडिलांच्या बचावासाठी सोशल मीडियासह सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्या आक्रमक होत्या.
शालिनी सिंह यांच्याकडे भाजपमध्ये सध्या कोणतेही पद नाही. मात्र, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्या पक्ष कार्यात सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे बृजबूषण यांच्या वारसदार म्हणून पाहिले जात आहे. आता वडिलांना हेलिपॅड गिफ्ट दिल्यानंतर त्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.