Brij Bhushan Singh sarkarnama
देश

Brij Bhushan Sharan Singh : कुस्तीगीर महासंघ बरखास्त केल्यानंतर खासदार बृजभूषण सिंहांना पुन्हा मोठा झटका

WFI Shifts Office : क्रीडा मंत्रालयाने व्यक्त केली नाराजी, कुस्तीगीर महासंघ बरखास्त करण्यात...

Roshan More

Delhi: भारतीय कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष, भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची अडचण वाढली आहे. आधीच क्रीडा मंत्रालयाने कुस्तीगीर महासंघ बरखास्त केला होता. या महासंघाचे कामकाज हे बृजभूषण यांच्या घरातूनच चालत असल्याचे समोर आले होते. हे कार्यालय येथून हटवण्याचे निर्देश देत बृजभूषण यांना मोठा झटका देण्यात आला आहे.

क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण सिंह यांच्या घरातच कुस्तीगीर महासंघाचे कार्यालय थाटल्याने गंभीर आक्षेप घेतला होता. या आक्षेपानंतर त्यानंतर शुक्रवारी (ता.29) बृजभूषण सिंह यांच्या घरातून हे कार्यालय हटवण्यात आले आता हे कार्यालय नवी दिल्लीतील हरी नगर भागात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कार्यालयाने वाढवली अडचण

क्रीडा कुस्तीगीर महासंघ बरखास्त करण्यामागे या महासंघाचे कार्यालय हे माजी अध्यक्षाच्या निवासस्थानी असल्याचे एक सांगितले जाते. बृजभूषण सिंह यांनी कुस्तीगीर महासंघाची निवडणूक लढवली नसतील तरी त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे या महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आले होते.

खेळाडूंचा आक्षेप

बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंकडून करण्यात आला होता. साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी कुस्तीगीर महासंघाच्या निवडणुकीनंतर आक्रमक पवित्रा घेतला होता. बृजभूषण यांचे निकटवर्तीय निवडून आल्यानंतर साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. तर, बजरंग पुनिया यांनी आपले पदक परत केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT