British PM Starmer Sarkarnama
देश

British PM Starmer: तेल वाहतुकीचा मार्ग 'हॉर्मुझ' पुन्हा सुरु करण्यासाठी ब्रिटनचा पुढाकार; बोलावली 35 देशांची बैठक; थेट अमेरिकेला आव्हान

British PM Starmer: इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे.

Amit Ujagare

British PM Starmer: इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बुधवारी हे स्पष्ट केलं की, ब्रिटन अमेरिका-इराण युद्धात सहभागी होणार नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी हे ठळकपणे सांगितलं की, हे आमचं युद्ध नाही, त्यामुळं यामध्ये सामिल हे राष्ट्रहितामध्ये नाही. त्याचबरोबर ज्या मार्गानं पश्चिम आशियात इराणमधून कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते तो हॉर्मुझ सामुद्रधुनिका मार्ग मोकळा करण्यासाठी ३५ देशांची बैठक बोलावली आहे.

डाऊनिंग स्ट्रीट इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर म्हणाले, हॉर्मुझ सामुद्रधुनित अडकून पडलेली जाहाजं आणि नाविकांच्या सुरक्षेची गॅरंटी देण्यासाठी तसंच अत्यावशक वस्तूंची देवाणघेवाण पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही जो शक्य आहे तो राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करु. यासाठी ३५ देशांची प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असून या बैठकीचं यजमानपद ब्रिटनचे परराष्ट्र सचिव यवेट कूपर करणार आहेत. लढाई संपल्यानंतर हॉर्मुझ स्ट्रेट सुलभ आणि सुरक्षित कशी राहील यावर या बैठकीत जोर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नाटोवर बोलताना स्टार्मर म्हणाले, नाटो जगातील आजवरचा सर्वाधिक प्रभावी सैन्य आघाडी आहे. यानं आपल्याला अनेक दशकांपासून सुरक्षित ठेवलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, ट्रम्प यांनी टेलीग्राफला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये नाटोला कागदी वाघ म्हटलं आहे. पण आम्ही नाटोप्रती पूर्णतः प्रतिबद्ध आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT