

Anjangaon Clashes: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या अंजनगावात सध्या तणावाचं वातावरण आहे. स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानं तसंच टायर जाळल्यानं जमावानं हिंसक पवित्रा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यामुळं हा वाद निर्माण झाला आहे. यावेळी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
अंजनगावात सकाळी एका समाजाच्या मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचा आरोप एका गटानं केला आहे. त्यामुळं जोपर्यंत पुतळा हटवला जात नाही तोपर्यत ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका विरोधी गटानं घेतली. त्यामुळं पोलिसांनी हा पुतळा हटवण्याचं काम हाती घेतलं. यावेळी पुतळा हटवण्यात येऊ नये म्हणून पुतळा बसवणाऱ्या गटानं थेट पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीचा व्हिडिओही समोर आला आहे. त्याचबरोबर चौकात टायर जाळून निषेध नोंदवला. पण या प्रकरणाला अशा प्रकारे हिंसक वळण मिळाल्यानं पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
दरम्यान, बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुमारे तासभर जमावाचा हा धिंगाणा सुरु होता. यावेळी पोलिसांवर दगड फेकण्यात आले, फटाके पेटवून फेकत असल्याचं दिसून आलं आहे. ही घटना घडल्यानं अंजनगावात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यामुळं पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं माध्यमातील वृत्तावरुन कळतं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.