Ashok Kharat Case: ...अन् मासे खायला द्यायचा! खरातच्या फसवेगिरीचा नवा पॅटर्न समोर

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात हा भोंदूबाबा असल्याचं त्याच्या आणखी एका फसवणुकीच्या पॅटर्नमुळं समोर आलं आहे.
police investigation in Ashok Kharat case
police investigation in Ashok Kharat caseSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात हा भोंदूबाबा असल्याचं त्याच्या आणखी एका फसवणुकीच्या पॅटर्नमुळं समोर आलं आहे. बड्या व्यवसायिकांना मासे खायला देऊन आणि याबाबत अनेक खोट्यानाट्या गोष्टी सांगून फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यामुळं चांगलीच खळबळ उडाली असून बड्या व्यावासियांक धाबं दणाणलं आहे.

police investigation in Ashok Kharat case
Farmer's Loan: कोर्टाच्या दणक्यानंतर शासनाला आली जाग! 2017 मधील प्रलंबित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी वितरित

नेमका विषय काय?

शाकाहारी बड्या व्यावसायिकांना मासे खाण्यासाठी अशोक खरात दबाव टाकत असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी मासे म्हणजे पाण्यातील वनस्पती असल्याचं काहीतरी तो सांगायचा. विशेष म्हणजे कट्टर शाकाहारी असलेल्या जैन धर्मीय व्यावसायिकांना त्यांना अशा प्रकारे फसवल्याचं दिसून आलं आहे. एसआयटीच्या तपासात खरातची ही बनवाबनवी समोर आली आहे. अशा प्रकारे खरातची कसून चौकशी सुरु असताना त्यातून दररोज विविध प्रकारचे धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत.

police investigation in Ashok Kharat case
Zirwal News : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांचा सुनेत्रा पवारांना फोन; आपला कुठलाही दोष नसल्याचं केलं स्पष्ट

कशा प्रकारे मासे खायला द्यायचा

मासा हा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून तो लोकांना प्रसाद म्हणून मासे खायला द्यायचा. मासा हा वनस्पती असल्याचं सांगताना मासा कापल्यास रक्त येत नाही तसंच त्याला हाडं नसतात असं तो सांगायचा. बड्या शाकाहारी व्यावसायिकांना अशा प्रकारे प्रसाद म्हणून मासे खायला देऊन त्यानं लाखो रुपये त्यांच्याकडून उकळले आहेत.

त्यामुळं अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल असताना त्याच्या या फसवेगिरीचे अनेक नवं नवे खुलासे होत आहेत, यावरुन तो फसवेगिरीच्या गुन्हेगारांचा कॅप्टन असल्याचं म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com