BSP News Sarkarnama
देश

Mayawati On Lok Sabha Election: मायावतींची वेगळी 'हत्तीची चाल'; स्वबळावर लढवणार लोकसभा निवडणुका!

BSP News: २१ टक्के लोकसंख्या दलित मते कोणाच्या बाजूने?

सरकारनामा ब्यूरो

Uttar Pradesh News : आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील बहुतांश पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूक कोणत्याही युती किंवा आघाडीत लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निवडणुकींना स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा जर इंडिया किंवा एनडीएसोबत गेला तर कोणाचा फायदा होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपण एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या तिसर्‍या बैठकीपूर्वीच त्याबाबतच्या शक्यतांना जोर आला आहे. मायावती यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका आपण एकट्याने लढवणार असल्याचं म्हटलं असलं, तरी निवडणुका जवळ आल्यानंतर त्या आपले पत्ते उघड करतील, अशी शक्यता बसपावर लक्ष ठेवून असलेल्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

एका अंदाजानुसार, उत्तरप्रदेशमध्ये २१ टक्के लोकसंख्या दलितांची आहे. मायावतींचा दलितांमध्ये चांगले प्राबल्य असल्याचे मानले जाते.अशा स्थितीत मायावतींचे राजकीय पाऊल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा जर 'इंडिया' किंवा एनडीए यापैकी ज्या आघाडीसोबत जातील त्यांचा फायदा होणार आहे. मायावतींच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात दलित मतदान जाणार असल्याने, ज्यांच्यासोबत मायावती जातील त्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मायावती आगामी काळात काय निर्णय घेणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT