Budget Session Live 2025 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारचे रिपोर्ट कार्डही सादर केले. संसदेत बोलतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) म्हणाल्या की, माझ्या सरकारने तिसऱ्या कार्यकाळात सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करण्याचा आणि ३ कोटी अतिरिक्त कुटुंबांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज, सरकार आपल्या अभूतपूर्व कामगिरीद्वारे भारताच्या विकासला चालना देत आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये, काम तिप्पट वेगाने केले जात आहे. आज देशात मोठे निर्णय आणि धोरणे वेगाने अंमलात आणली जात आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार करून तीन कोटी अतिरिक्त कुटुंबांना नवीन घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी समाजातील पाच कोटी लोकांसाठी धरती आबा आदिवासी ग्राम विकास अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासोबतच मुर्मू म्हणाल्या की, आमचे सरकार सतत मिशन मोडमध्ये काम करत आहे, ज्याचे फायदे देखील दिसून येत आहेत. परदेशातून मोठी गुंतवणूक येत आहे आणि त्यामुळे देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. याशिवाय त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे प्रकल्प पूर्ण होणे ही एक मोठी अभिमानाची बाब आहे.
एमएसएमईसाठी क्रेडिट गॅरंटी योजना
मुद्रा कर्ज 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आले.
25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले.
इंटर्नशिप योजनेने तरुणांना बळकटी दिली
ड्रोन दीदींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, ३ कोटी दीदी निर्माण करण्याचे लक्ष्य
8000 कोटी खर्च करून देशात 52000 इलेक्ट्रिक बस धावतील.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता
कर संबंधित नियम सोपे करण्यात आले.
भारत एआयबाबत जगाला मार्ग दाखवत आहे.
आज देशातील महिला लढाऊ विमाने उडवत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकारी योजनांमुळे देशातील गरिबांना सन्मान मिळाला आहे. याशिवाय, केंद्राने महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. आरोग्यसेवेसह विविध क्षेत्रात सरकारने सुरू केलेल्या योजनांचा परिणाम दिसून आला आहे, ज्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. आदिवासी भागात 30 वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत, ज्याचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला होत आहे. ईशान्येकडील विकास योजनांवर काम केले गेले आहे आणि दलित आणि वंचित समाजाला सरकारी योजनांचा चांगला फायदा झाला आहे. दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे. भारताने ग्लोबल लीडर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आज जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर विकासाला गती मिळाली आहे. भाषणाच्या शेवटी राष्ट्रपती म्हणाल्या की, एकमेव ध्येय 'विकसित भारत'.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.