Indian Passengers bus and Bangladesh Sarkarnama
देश

Indian Passengers bus and Bangladesh: बांगलादेशात भारतीय प्रवाशांच्या बसवर हल्ला; प्रवाशांना धमकावून, भारतविरोधी घोषणाबाजी

Bus carrying Indian passengers attacked in Bangladesh : त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली; जाणून घ्या, त्रिपुराचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत या घटनेवर?

Mayur Ratnaparkhe

Tripura Transport Minister Sushant Chaudhary : बांगलादेशात भारतीय तसेच हिंदूंवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज नवीन घटना समोर येत आहेत. दरम्यान आता भारतीयांनी भरलेल्या एका बसवरही हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. त्रिपुराचे परिवहनमंत्री सुशांत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.

सुशांत चौधरींनी आरोप केला की, अगरताळाहून कोलकाताला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांनी भरलेल्या एका बसवर बांगलादेशात हल्ला झाला. त्यांनी म्हटले की, ही घटना बांगलादेशातील ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील विश्व रोड वर घडली. सुशांत चौधरी यांनी शनिवारी फेसबुकवरही या घटनेचे फोटो शेअर केले आहेत.

सुशांत चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, त्रिपुराहून कोलकाताला जाणाऱ्या श्यामोली परिवहन बसवर बांगलादेशातील ब्राह्मणबारिया येथील विश्व रोडवर हल्ला केला गेला. या हल्ल्यामुळे बसमधील सर्वच प्रवाशी प्रचंड घाबरले. बस आपल्या लेनमधूनच जात होती. तितक्यात एका ट्रकने जाणूनबुजून बसला धडक दिली. याचदरम्यान एक रिक्षाही बसच्या समोर आली आणि बस व रिक्षामध्ये टक्कर झाली.

या घटनेनंतर जमलेल्या स्थानिकांनी बसमधील भारतीय प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. शिवाय, भारतविरोधी घोषणाबाजीही केली गेली आणि भारतीय प्रवाशांसोबत गैरवर्तन करण्यात आले. एवढच नाहीतर प्रवाशांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. मी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच शेजारील देशाच्या प्रशासनास भारतीय प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचाही आग्रह करतो. असं सुशांत चौधरी यांनी म्हटले आहे.

या घटेनवर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साह यांनी म्हटले की, त्यांना बसवरील हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळाली, ते याबाबत अधिक माहिती घेत आहेत. तसेच बांगलादेशात दिवसेंदिवस भारतीय आणि हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की आज संपूर्ण जग बघत आहे की, कशाप्रकारे बांगलादेशात हिंदूंना अत्याचारास सामोरे जावे लागत आहे. आमच्या राज्याच्या तिन्ही बाजूने बांगलादेश असल्याने मी आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT