Mehbooba Mufti : भारत आणि बांग्लादेशात काहीच फरक नाही..! माजी मुख्यमंत्र्यांनी दोन घटना सांगितल्या...

Bangladesh India Sambhal Minorities Situation : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकार आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
Mehbooba Mufti
Mehbooba MuftiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारत आणि बांग्लादेशाची तुलना करणारे मोठे विधान केले आहे. दोन्ही देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा मुद्दा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

संभल येथील शाही जामा मशिदीत सर्व्हेक्षणावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यावरून बोलताना मुफ्ती म्हणाल्या, सध्याची स्थिती आपल्याला 1947 च्या दिशेने घेऊन जातेय की काय, अशी भीती वाटतेय. युवक काम मागत असताना ते मिळत नाही. चांगले शिक्षण, रुग्णालये नाहीत. सरकार रस्ते चांगले करत नाही पण मंदिरांचा शोधासाठी मशीद पाडली जात आहे. संभलमध्ये घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

Mehbooba Mufti
Mohan Bhagwat : जोडप्याला किमान तीन मुलं हवीत! मोहन भागवतांना लोकसंख्येबाबत सतावतेय चिंता...

बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. जर भारतातही अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतील तर भारत आणि बांग्लादेशामध्ये काही फरक आहे? भारत आणि बांग्लादेशात मला काहीच फरक आढळत नाही, असे विधान मुफ्ती यांनी केले आहे. त्याआधी त्यांनी अजमेर शरीफ दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

अजमेर शरीफ दर्ग्यांमध्ये सर्व धर्मांचे लोक प्रार्थना करतात, हे बंधुभावाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आता ते मंदिरांच्या शोधासाठी तिथेही खोदण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी नाराजी मुफ्तींनी व्यक्त केली. अजमेर शरीफ दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिव मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. त्याठिकाणी हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Mehbooba Mufti
Assembly Election : महाराष्ट्रातील पराभवानंतर काँगेसला दिल्लीतही झटका; केजरीवालांकडून मोठा निर्णय

दरम्यान, बांग्लादेशमध्ये हिंदू नागरिक व मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडतच आहेत. या घटनांविरोधात आवाज उठवणारे इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावरून भारतानेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारतात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com