Uttarakhand minister Rekha Arya Controversy : उत्तराखंडच्या कॅबिनेट मंत्री रेखा आर्या यांची पतीवरच धक्कादायक आरोप केले आहेत. आपल्याला जीवे मारण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच फसवणूक, मारहाण, जातीय भेदभावाचे आरोप करत त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. दरम्यान, रेखा आर्या यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेखा आर्या यांनी डेहराडूनच्या कॅन्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गिरधारी लाल साहू ऊर्फ पप्पू गिरधारी असे मंत्र्यांच्या पतीचे नाव आहे. तक्रारीनुसार, पतीने लग्नावेळी आपली दिशाभूल केली. पहिले लग्न त्यांनी लपवून ठेवले. लग्नानंतर आपला शारीरिक व मानसिक छळही केला. कंपन्यांमधील संचालकपदावरून हटवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. जीवे मारहण्यासाठी षडयंत्रही रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा आर्या यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, आपला ६ जुलै २००४ रोजी विवाह झाला. त्यावेळी पतीने आपण अविवाहित असल्याचे सांगितले हते. पण त्यांचे आधीच लग्न झाल्याचे नंतर समजले. पहिल्या लग्नापासून त्यांनी मुलेही होती. आपल्याला अलीकडेच पतीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचेही समजले.
अनैतिक संबंधांना विरोध केल्यानंतर पतीने आपली लेखी तसेच तोंडी माफीही मागितली. पण त्यानंतरही वागण्यात फरक पडला नाही. उलट त्यावर बोलल्याने आपल्याला मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा दावा रेखा आर्या यांनी तक्रारीत केला आहे. सरकारी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांसमोरच आपल्या जातीविरुध्द अपशब्द वापरल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आर्या यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे पतीचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये आपले पती एका महिलेशी बोलताना आपल्याला जीवे मारण्याचे षडयंत्र रचत असल्याचा दावा आर्या यांनी तक्रारीत केला आहे. आपल्या आणि अल्पवयीन मुलाच्या जीवाला धोका असल्याने लवकरात लवकर पतीवर कारवाई करावी, अशी मागणी आर्या यांनी पोलिसांकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.