Modi government plan : दिवाळीआधीच दिल्लीत होणार मोठा धमाका? मोदी सरकारचा विरोधकांना संसदेत नामोहरम करण्याचा प्लॅन समोर

PM Narendra Modi, Parliament special session, special Parliament session 2026, delimitation bill : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे अद्याप राष्ट्रपतींकडून सत्रावसान करण्यात आलेले नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाबाबतच्या चर्चांना बळ मिळू लागले आहे.
Narendra Modi in Parliament
Narendra Modi in ParliamentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Women reservation bill news : इंडिया आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवत थेट केंद्र सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हाताशी धरून मतचोरी केली जात असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षेनेते राहुल गांधी सातत्याने करत आहे.

एकीकडे विरोधकांच्या आरोपांची धार वाढलेली असतानाच मोदी सरकारनेही विरोधकांना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस म्हणजे दिवाळीपूर्वी दिल्लीत मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. या अधिवेशन मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडले जाऊ शकते.

'इंडिया टुडे'ने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार लोकसभेमध्ये ही विधेयके पारित करण्यासाठी पुरेसे संख्याबळ सरकारकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकार डीएमकेसह अन्य काही छोट्या पक्षांशी सोबत याबाबत चर्चा करत असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

Narendra Modi in Parliament
Vinod Tawde news : भाजपला केवळ 3 जागा, पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला! प्रभारी असताना झालेल्या पराभवाकडे बोट दाखवत विनोद तावडेंचा काँग्रेसवर घाव

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे अद्याप राष्ट्रपतींकडून सत्रावसान करण्यात आलेले नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाबाबतच्या चर्चांना बळ मिळू लागले आहे. सरकारकडून अधिवेशनाच्या तारखांबाबत चर्चा सुरू आहे. या तारखा निश्चित झाल्यानंतर आठवडाभर आधी त्याबाबत नोटीस जारी केली जाऊ शकते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक पारित करता आले नव्हते. विरोधकांच्या एकजुटीमुळे पहिल्यांदाच लोकसभेत सरकारला या विधेयकामुळे पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा सरकारने तयारी सुरू केली आहे. काँग्रेसपासून दुरावलेला डीएमके हा एकमेव पक्ष एनडीए सरकारला आशेचा किरण वाटत आहे. तसेच काही छोट्या पक्षांनाही हाताशी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Narendra Modi in Parliament
Divya Mittal political party : माजी IAS दिव्या मित्तल यांच्याकडून भाजपविरोधात उमेदवारी जाहीर; कोणत्या पक्षाकडून लढणार? केली महत्वपूर्ण घोषणा

डीएमकेने विरोध केल्यास सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फिरू शकते. पण सध्याची राजकीय स्थिती पाहता डीएमकेकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता कमी आहे. एसआरआयच्या मुद्यावरून डीएमके इंडिया आघाडीच्या आंदोलनापासून दूर असले तरी सुरूवातीपासूनच विरोध कायम राहिला आहे. त्यामुळे आता पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com