

SIR Controversy news : देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या SIR प्रक्रियेवरून विरोधकांनी रान उठविले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांकडून राजधानी दिल्लीत दररोज विविध माध्यमातून आयोगासह केंद्र सरकारवरही निशाणा साधला जात आहे. त्याला भाजप नेत्यांकडूनही आता आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत काँग्रेसवर घाव घातला आहे. त्यांनी केरळमधील भाजपच्या पराभवाचे उदाहरण देत काँग्रेसला आरसा दाखविला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी केरळम विधानसभेने मंजूर केला आहे. त्यावरून तावडे चांगलेच भडकले.
केरळ विधानसभा निवडणुकीवेळी तावडे हे पक्षाचे प्रभारी होती. तावडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, केरळमध्ये SIR प्रक्रियेच्या आधारे तयार झालेल्या मतदारयादीवरच निवडणूक झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने १४० पैकी १०२ जागा जिंकल्या. काँग्रेसने या विजयाला जनतेचा कौल म्हटले होते.
काँग्रेसच्याच केरळम सरकारने आता SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला, असे तावडेंनी म्हटले आहे. केरळममधील जनतेचाही कौल चोरला गेला होता का?, काँग्रेसचा पराभव झाला की ‘मतचोरी’ सुरू होते?, असे सवाल तावडेंनी राहुल गांधींना केले आहेत. केरळममध्ये भाजपला केवळ ३ जागा मिळाल्या. कोणतीही सबब न देता पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला, असेही तावडेंनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसने माजी निवडणूक आयुक्तांना कॅबिनेटमध्ये घेतले होते. काहींना पद्म भूषण, पद्म विभूषण देऊन सन्मानित केले. राज्यपालही बनविले होते. हा सौदेबाजीचाच प्रकार असल्याचे सांगत गोयल यांनी काही माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावांचाही उल्लेख केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.