West Bengal Election TMC VS BJP  Sarkarnama
देश

TMC news : धक्कादायक पराभवानंतर ममतादीदींच्या पक्षाला कोर्टाकडून पहिला दिलासा; एक आमदार वाढणार?

Jahangir Khan relief, Falta Assembly re-poll : फालटा हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मानला जातो. २०११ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आहे.

Rajanand More

West Bengal political news : पश्चिम बंगालमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत १५ वर्षांपासूनची तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सातत्याने धक्के बसत आहे. काही नेत्यांनी उघडपणे पक्षांतर्गत राजकारणावर टीकास्त्र सोडले. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या संपत्तीचीही चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. ममता सरकारचे निर्णयही नव्या सरकारकडून बदलले जात असून काही नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

बंगालमध्ये नवे सरकार आल्यानंतर टीएमसी सोमवारी पहिला मोठा दिलासा मिळाला आहे. कोलकाता हायकोर्टाने तृणमूलचे नेते जहांगीर खान यांच्याविरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांना फालटा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

मागील महिन्यांत राज्यात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी या मतदारसंघात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली आहे. या मतदारसंघात २१ मे रोजी मतदान होणार आहे. पण त्याआधीच जहांगीर यांच्याविरोधात काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांत त्यांच्यावर २६ मेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

जहांगीर यांनी आपल्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने राजकीय परिस्थिती बदलल्याचे कारण देत अंतरिम आदेश दिला. कोर्टाने म्हटले की, हा लोकशाही असलेला देश आहे. राज्यात ४ मे नंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यांच्याविरोधात ४ ते १० मे दरम्यान अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे कोर्टाने म्हटले.

दरम्यान, फालटा हा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील मानला जातो. २०११ पासून या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी होत आहे. यावेळी पक्षाने जहांगीर खान यांना मैदानात उतरविले आहेत. ते या मतदारसंघातील मातब्बर नेते मानले जातात. मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असल्याने खान यांच्याकडून आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, भाजपच्या लाटेत त्यांचा निभाव लागणार का, तृणमूलची एक जागा वाढणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT