TVK government : CM विजय यांचे सरकार सहा महिन्यांत कोसळणार! बड्या नेत्यानं उडवून दिली खळबळ

Anitha Radhakrishnan statement : विजय यांनी राजीनामा दिलेल्या त्रिची विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्टॅलिन उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
DMK vs TVK
DMK vs TVKSarkarnama
Published on
Updated on

DMK vs TVK news : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना सत्तास्थापन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. पण बहुमत सिध्द करण्याच्या दिवशी त्यांना एआयएडीएमकेच्या एका गटाने पाठिंबा देत सर्वांनाच धक्का दिला. या पाठिंब्यामुळे विजय यांचे सरकार आता पाच वर्षांसाठी स्थिर झाल्याची चर्चा सुरू असतानाच एका बड्याने नेत्याने धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

डीएमकेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विजय यांचा शपथविधी होण्यापूर्वी एक विधान केले होते. सरकार स्थापन होऊद्या, आम्ही सहा महिन्यापर्यंत सरकारला डिस्टर्ब करणार नाही, असे स्टॅलिन म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार अनिता राधाकृष्णन यांनीही विजय यांचे सरकार सहा महिनेही चालणार नाही, असे विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना राधाकृष्णन म्हणाले, या सरकारकडे केवळ आणखी चार महिनेच आहेत. चार किंवा सहा महिन्यांनी आमचे नेते मुख्यमंत्री बनतील, असे सांगत राधाकृष्णन यांनी स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे भाकित केले आहे. त्यांनी मंत्री आधव अर्जुन यांनाही पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आव्हानही दिले आहे.

DMK vs TVK
CM oath ceremony : राहुल गांधींसोबत भाजपचे नेते; सतीशन यांनी शपथविधी केला ऐतिहासिक, 64 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

एक व्यक्ती आहे, आधव अर्जुन. त्यांच्यात हिमंत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा, मीही देतो. तिरुचेंदूर मतदारसंघातून दोघे निवडणूक लढवू. हे शहर आमचे आहे. आम्ही कुणालाही हरवू, असे राधाकृष्णन म्हणाले. दरम्यान, राधाकृष्णन यांच्या विधानामुळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

DMK vs TVK
Congress News : केरळमध्ये शपथविधीच्या काही तास आधी भाजपकडून काँग्रेसला हिमाचल प्रदेशात धक्का; हातातून सत्ता जाणार?

विजय यांनी राजीनामा दिलेल्या त्रिची विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत स्टॅलिन उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर विजय यांच्या सरकारबाबत राधाकृष्णन यांनी वर्तविलेल्या भविष्यवाणीला महत्व प्राप्त झाले आहे. विजय यांची सत्तास्थापन होण्याआधी डीएमके आणि एआयएडीएमकेची आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू होती. डीएमकेच्या मित्रपक्षांकडूनच याबाबत गौप्यस्फोट करण्यात आला होता. आता डीएमकेच्या आमदाराने विजय यांचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com