Iran and Canada Accident Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर ‘या’ दोन घटनांनी पुन्हा हादरलं जग; Video पाहून बसेल धक्का

Global Reactions to the Accidents in Canada and Iran : इराणमधील अब्बास शहराच्या राजई बंदरात शनिवारी स्फोट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Rajanand More

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्यूने भारतासह संपूर्ण जगाला हादरा बसला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. पहलगामनंतर पुन्हा एकदा जगाला हादरवणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. एक घटना कॅनडातील तर एक इराणमधील आहे. इराणमध्ये एक बंदरावर भीषण स्फोट झाला असून कॅनडात रस्त्यावर सुरू असलेल्या फेस्टिव्हलदरम्यान एका कारने अनेकांना चिरडले आहे. या दोन्ही घटना अपघात आहेत तर दहशतवादी हल्ले याबाबत तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

इराणमधील अब्बास शहराच्या राजई बंदरात शनिवारी स्फोट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटाचा भीतीदायक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरत होत आहे.

स्फोटानंतर धुरांचे लोट अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होते. इराणमधील प्रसिध्द बंदरांपैकी राजई हे एक प्रसिध्द बंदर असून इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचे मानले जाते. हे बंदर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात याच बंदरातून होते. शनिवारी कंटेनर यार्डमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्राथमिक तपासात ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणा समोर आला आहे. त्याचप्रमाणे इतर अंगांनीही तपास केला जात आहे.

शनिवारी रात्री कॅनडामध्येही मोठी दुर्घटना घडली आहे. कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एका स्ट्रीट फेस्टिव्हलदरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिडरले आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून मन हेलावून टाकणारी दृश्य दिसत आहेत. अनेकांचा या अपघातात मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. उत्सवादरम्यान रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीतच वेगात कार घुसविण्यात आली. कारखाली अनेक जण चिरडले गेले. तसेच यादरम्यान चेंगराचेंगरीही झाली. त्यातच लोकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केले जात आहे. हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला तर नाही ना, याचाही शोध पोलिस घेत आहेत. या अपघातातील मृतांचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT