Jhelum River flood : भारताचा दुसरा 'वॉटर स्ट्राईक'? झेलम नदीचे पाणी अचानक वाढल्याने पाकिस्तानात महापूर, आणीबाणी जाहीर

Jhelum River Water Release Impact on Muzaffarabad : एकीकडे भारताने पाकिस्तानला सिंधू नदीतून पाणी न सोडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील नद्यांना अचानक पूर आला आहे. तर या पूर परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
Jhelum River flood
Jhelum River floodSarkarnama
Published on
Updated on

Jhelum River Floods : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पोसल्याचा आरोप करत सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे भारताने पाकिस्तानला सिंधू नदीतून पाणी न सोडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील नद्यांना अचानक पूर आला आहे. तर या पूर परिस्थितीला भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

Jhelum River flood
Pahalgam terror attack : काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचं सर्वात मोठं कोंबिंग ऑपरेशन; दहशतवाद्यांशी हात मिळवणी करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना घेतलं ताब्यात

भारताने अचानक झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे हा पूर आल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. दरम्यान, या पुरामुळे पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुजफ्फराबाद व आसपासच्या भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे पूर आल्याचा दावा पाकिस्तानने केला असून या पूर परिस्थितीमुळे हट्टियन बाला परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Jhelum River flood
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याप्रकरणी सर्वात मोठी अपडेट; केंद्रीय गृहमंत्रालयानं तपास 'एनआयए'कडे सोपवला ?

मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान, पाकिस्तानने भारताला या पुरासाठी जबाबजार धरलं असलं तरी भारताने अद्याप यावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

त्यामुळे झेलम नदीला अचानक पूर कशामुळे आला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर पाकच्या या आरोपांना भारत काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र, सध्या पाकने केलेल्या आरोपांमुळेच भारताने पाकिस्तानवर पुन्हा एक वॉटर स्ट्राईक केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com