Mann Ki Baat : 'ते' फोटो पाहून रक्त खवळलंय, नक्की न्याय मिळणार...'; पहलगाम हल्ल्यानंतरच्या 'मन की बात'मधून PM मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा

PM Modi assures justice for Pahalgam attack victims : "मी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना खात्री देतो की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल", असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे.
Narendra Modi, Pahalgam terror attack
Narendra Modi, Pahalgam terror attackSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Mann Ki Baat : "मी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना खात्री देतो की, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल", असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कडक इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं. या कार्यक्रामच्या 121 व्या एपिसोडमध्ये बोलताना त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय नक्की न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलं.

'मन की बात' मध्ये बोलताना ते म्हणाले, "आज मला तुमच्याशी बोलत असताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झालं आहे. या हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त उसळलं आहे, याची मला कल्पना आहे. दहशतवादाविरोधातील या युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे."

Narendra Modi, Pahalgam terror attack
Jhelum River flood : भारताचा दुसरा 'वॉटर स्ट्राईक'? झेलम नदीचे पाणी अचानक वाढल्याने पाकिस्तानात महापूर, आणीबाणी जाहीर

तर जम्मू काश्मीरची प्रगती काही लोकांना पाहवत नाही. काश्मीर जळत राहावं असं दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना वाटतं असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. शाळा-कॉलेज सुरू झाले होते. पर्यटकांची संख्या वाढत होती त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला.

कारण देशाच्या दुश्मनांना काश्मीर पूर्वपदावर येऊ नये असं वाटतं. तर दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या आकांना नेहमी काश्मीर जळत राहावं असं वाटतं, त्यामुळे ते असे हल्ले घडवून आणत आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरच्या लोकांना दहशतवाद्यांचं हे कृत्य आवडलं नाही.

दहशतवादाविरूद्धच्या या युद्धात 140 कोटी भारतीय एक झाले आहेत. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय नक्की मिळेल. या हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी हल्लेखोरांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला.

Narendra Modi, Pahalgam terror attack
Pahalgam terror attack : काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचं सर्वात मोठं कोंबिंग ऑपरेशन; दहशतवाद्यांशी हात मिळवणी करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना घेतलं ताब्यात

संपूर्ण जग भारतासोबत

तसंच यावेळी त्यांनी जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केल्याचंहगी सांगितलं. ते म्हणाले, देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपला संकल्प आणखी बळकट करायचा आहे. या हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये जो राग आहे, तोच जगभरात आहे. संपूर्ण जग भारतीयांसोबत उभे आहे. या दहशतवादी हल्ल्याची जगभरात निंदा केली जात आहे. जागतिक नेत्यांनी मला फोन केलेत, पत्रे लिहित या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com