Chandrashekhar Rao, G. kamlakar, allola readdy Sarkarnama
देश

Telangana Election : तेलंगणात दिग्गज नेत्यांचे 'सेम टू सेम' नाव असलेले उमेदवार !

Sachin Waghmare

Telangana Assembly Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. 30 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होत आहे. सर्वच पक्षांकडून जोरात प्रचार केला जात असताना काही जणांनी या निवडणुकीसाठी वेगळाच फॉर्म्युला अंमलात आणला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात विविध राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षाचे उमेदवार उतरले आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याच्या दृष्टीने दिग्गज नेत्यांची नाव साधर्म्य असलेले उमेदवार छोट्या पक्षाने रिंगणात उतराविले आहेत. या नाव साधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत.

दिग्गज नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरविल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार असून त्यामुळे या मत विभागणीच्या माध्यमातून दिग्गज उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असे त्यामागील समीकरण आहे. या नाव साधर्म्यचा फटका मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrashekhr rao) यांना बसणार असून त्यांच्या कामारेड्डी मतदारसंघातून त्यांच्या नावाशी मिळते जुळते नाव असलेला चंद्रशेखर नावाचा अपक्ष उमेदवार नशीब अजमावत आहे.

त्यासोबतच निर्मल येथून सत्ताधारी बीआरएसचे पक्षाचे नेते तथा राज्यमंत्री अल्लोला इंद्रकरण रेड्डी हे या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात लोकशाही परिवर्तन आघाडीच्यावतीने मंथेना इंद्रकरण रेड्डी निवडणूक लढत आहेत.

करीमनगरमधून बीआरएसचे नेते तथा मंत्री जी कमलाकर (G Kamlakar) यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार जी कमलाकर हे देखील निवडणूक लढवत आहेत. त्यासोबतच श्रीनिवासन एन, श्रीनिवासन बी, श्रीनिवासन पी, श्रीनिवासन हे देखील नाव साधर्म्य असेलेली मंडळी करीमनगर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरली आहेत.

सिरपूर मतदार संघातून बसपाचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रवीण कुमार यांच्या विरोधात अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे डोंगरी प्रवीण कुमार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात ही त्यांच्या प्रमाणे नाव असलेले उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या समान नावाचा फायदा कोणाला होणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहा उमेदवार निवडणूक रिंगणात

राज्यात नोंदणीकृत पक्षासह राष्ट्रीय व स्थानिक पक्षाचे दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवाराची संख्या मोठी आहे. या दहा ठिकाणी दिग्ग्ज नेत्याच्या नावाशी साधर्म्य असलेला नेता निवडणूक रिंगणात उतरविण्यात आला आहे. त्यामुळे अशास्वरुपाची रणनीती येत्या काळात किती यशस्वी ठरते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT