Bullock Cart Stone Pelting News : बैलगाडा शर्यतीत गोंधळ; भाजप खासदार अनिल बोंडेंवर दगड फेकले..

Bullock Cart Stone Pelting News : "दगडफेक करणारे काँग्रेस पक्षाशी संबंधीत आहेत का?"
Bullock Cart Stone Pelting News :
Bullock Cart Stone Pelting News :Sarkarnama

Amaravati News : अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे एका बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमात किरकोळ दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.या दगडफेकीच्या घटनेत भाजपचे नेते व खासदार अनिल बोंडे यांच्या दिशेने काहींनी दगड भिरकावले आहे. या घटनेमध्ये बोंडे यांना मार लागला आहे. मात्र, त्यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. मात्र यामुळे अमरावतीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. (Latest Marathi News)

Bullock Cart Stone Pelting News :
Sanjay Gaikwad : मुख्यमंत्र्यांच्या डॅशिंग आमदारावर फरार होण्याची वेळ; अटकेची शक्यता..

या किरकोळ दगडफेकीच्या घटनमध्ये खासदार अनिल बोंडे यांच्या पाठीला आणि डोक्यावर मार लागला आहे. मात्र त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. दरम्यान या घटनेवरून बोंडे यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. हे दगडफेक करणारे काँग्रेस पक्षाशी संबंधीत आहेत का? असतील तर त्यांचा आम्ही शोध घेऊन, कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Bullock Cart Stone Pelting News :
NCP Crisis : ‘दादा...दादा..करता अन्‌ पिटिशन दाखल करता’ तटकरेंच्या प्रश्नाला सुळेंचे उत्तर ‘मी मर्यादा ओलांडणार नाही...’

अनिल बोंडे म्हणाले, "तिवसा येथील बैलगाडा शर्यतीत काही लोकांनी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात दगड फेकणारे टाळके नेमके कोणाचे होते. ते टाळके काँग्रेसचे आहे का? याचा आम्ही शोध घेणार आहोत. काही समाजकंटक आपल्या गावाला बदनाम करत असतील तर त्याची काळजी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रीय बोंडेंनी दिली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com