Telngana Vidhnsabha Election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहाेचला असून, आता शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षाने स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता सर्वांनी तेलंगणावर लक्ष केंद्रित केले असून, येत्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे आता तेलंगणातील वातावरण ढवळून निघणार आहे.
राजस्थानमधील प्रचाराची सांगता झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचे स्टार प्रचारक तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करून तेलंगणा पिंजून काढलेला आहे. पुढील दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रिय होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा २६ नोव्हेंबरला हैदराबादमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्याशिवाय इतर काही नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी प्रियांका गांधी यांच्या एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. त्या कामात जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत प्रचारासाठी हजेरी लावणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शनिवारी राहुल गांधी हे क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या जुबली हिल्स मतदारसंघातून प्रचाराला सुरुवात करणार आहेत, तर आदीलाबाद निजामाबाद येथे त्यांच्या सभा होणार आहेत. सिकंदराबाद येथे रोड शोने 28 नोव्हेंबरला काँग्रेसच्या प्रचाराची सांगता राहुल गांधींच्या उपस्थितीत होणार आहे.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.