Amarinder Singh-Narendra Modi  Sarkarnama
देश

Captain Amarinder Singh : भाजपचा मोठा निर्णय : कॅप्टन अमरिंदर सिंगांवर सोपवली मोठी जबाबदारी

ही दोन्ही नेते पंजाब विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आणि दिग्गज नेते, माजी खासदार सुनील जाखड (Sunil Jakhar) यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही दोन्ही नेते पंजाब (Panjab) विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर आता भाजपने मोठा विश्वास टाकला आहे. (Captain Amarinder Singh elected to BJP's National Executive Committee)

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज कॅप्टन सिंग आणि जाखड यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केले आहे. या दोघांबरोबरच पंजाब, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही नेत्यांना राष्ट्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग, सुनील जाखड, स्वतंत्रदेव सिंह यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मदन कौशिक, विष्णुदेव साय, एस. राणा गुरमित सिंह सोढी, मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामूवालिया यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतले आहे. पंजाबच्या जयवीर शेरगील यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजपने या नियुक्त्या केल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, कॅप्टर अमरिंदर सिंग आणि सुनील जाखड हे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर ते भाजमध्ये सामील झाले होते. याशिवाय जयवीर शेरगील हेसुद्धा काँग्रेसमधून भाजपत आलेले नेते आहेत. त्यांच्यावर आता भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना थेट भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेत राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT