Dheeraj Wadhawan Sarkarnama
देश

Dheeraj Wadhawan Arrest : DHFL मध्ये तब्बल 34000 कोटींचा घोटाळा; धीरज वाधवनला CBIकडून अटक, काय आहे प्रकरण?

DHFL Banking Fraud : या प्रकरणाबाबत सीबीआयने वाधवन यांच्यावर 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने 17 बँकांच्या कन्सोर्टियमची 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Bank Froud News : डीएचएफएल बँकेचे माजी संचालक धीरज वाधवनला 34 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने मंगळवारी (ता. १४) अटक केली आहे. दरम्यान, वाधवन हे येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना अटक केली होती. त्यानंतर ते जामीनावर होते. आता त्यांना डीएचएफएल बँक कर्ज प्रकरणी चौकशी करून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणाबाबत सीबीआयने CBI वाधवन यांच्यावर 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने 17 बँकांच्या कन्सोर्टियमची 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यात देशातील सर्वात मोठी बँकिंग कर्ज फसवणूक झाल्याचे सीबीआयने नमूद केले होते. आता त्या प्रकरणी जामीनावर असलेल्या धीरज वाधवन यांना अटक केली आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये, सेबीने डीएचएफएलचे DHFL माजी संचालक धीरज आणि कपिल वाधवन या बंधुना 22 लाखांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्यांना बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स संलग्न करण्याचे आदेश दिले होते. मात्र या वाधवन बंधून त्याचे उल्लंघन केले. त्यामुळे गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला होता. तो दंड भरण्यात ते अयशस्वी झाल्यानंतर वाधवन यांना ताब्यात घेतले होते.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात धीरज वाधवान यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी अर्ज केला होता. ते फेटाळल्यानंतर वाधवन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर मुंबईतील त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीबीआयला शनिवारी नोटीस बजावली आणि उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणी शुक्रवारी (ता. 17) सुनावणीसाठी होणर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत वाधन बंधू?

कपिल वाधवन हे DHFL चे अध्यक्ष आणि MD होते. तर धीरज वाधवन कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक होते. हे दोघेही डीएचएफएलच्या संचालक मंडळावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT