Narendra Modi Wealth: PM मोदींकडे 'ना घर, ना कार'; किती आहे एकूण संपत्ती? 'ही' माहिती आली समोर

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती जाहीर केली आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : देशाचे लक्ष असलेल्या वारणसी लोकसभा मतदारसंघात सातव्या टप्प्यात म्हणजे 1 जून रोजी मतदान होत आहे. येथून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अजय राय तर बसपाचे अथर अली अशी तिहेरी लढत होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यावेळी संपत्तीबाबत माहितीही दिली आहे. यातून त्यांच्याकडे तीन कोटी दोन लाखांची एकूण संपत्ती असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून मोठे शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी (ता. 14) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती तीन कोटी दोन लाख आहे. तर त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जमीन, घर आणि कार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, तीन कोटी दोन लाखांची किमतीची एकूण संपत्ती आहे. त्यातील त्यांत त्यांच्या बँकेतील मुदत ठेवी आहेत. यात दोन कोटी 86 लाखांच्या मुदत ठेवी स्टेट बँकेत आहेत. तर त्यांच्याकडे एकूण 52 हजार 920 रुपयांची कॅश आहे. तर गांधीनगर आणि वाराणसी येथील दोन बँक खात्यांमध्ये 80 हजार 304 रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Narendra Modi
Agri Sena : ठाणे, पालघरमधील महायुतीच्या उमेदवारांना आगरी सेनेने जाहीर केला पाठिंबा!

पंतप्रधानांकडे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक म्हणून नऊ लाख 12 हजार रुपये आहेत. तसेच त्यांच्याकडे दोन लाख 68 लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्यांचाही समावेश आहे. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञाप्रत्रातून त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना 2018-19 मध्ये उत्पन्नातून 11 लाख 14 हजार रुपये मिळाले होते. तर 2022-23 मध्ये ते वाढून 23 कोटी 56 लाख उत्पन्न झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींनी 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कला पदवी घेतली आहे. तर 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून एमए पूर्ण केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हेगारी खटले प्रलंबित नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, त्यांच्या शिक्षणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Narendra Modi
Raj Thackeray : राज ठाकरे प्रचार करतात त्या उमेदवाराचा पराभव होतो; ठाकरे गटाने इतिहासच सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com