Narendra Modi Rally : मोदींच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच पोलीस 'ॲक्शन मोड'वर; ठाकरे गटाच्या पदाधिकारी ताब्यात

Dindori constituency : कांद्याच्या मुद्य्यावरून मोदींच्या सभेत गोंधळ घातला जाण्याची शक्यता पाहता, पोलिस सतर्क झाले आहेत.
Dindori Thackeray group leader
Dindori Thackeray group leaderSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : दिंडोरीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विरोध होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस सावध झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होत आहे. पिंपळगाव बसवंत येथे ही सभा होईल. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील असतील. सध्या या भागात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न गंभीर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dindori Thackeray group leader
Narendra Modi : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी निफाडमध्ये होणार मोदींची प्रचारसभा!

पंतप्रधान मोदी(PM Modi) यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला विरोध केला होता. या सभेत कांदा प्रश्नाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणार असल्याचे जाहीर केले होते. काही शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांनी या सभेत गोंधळ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत आणि सभेच्या पूर्वसंध्येला आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

दुपारी पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, आशिष शिंदे यांना पोलीस ठाण्यात नेऊन डिटेन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खंडू बोडके पाटील म्हणाले गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी कांदा उत्पादकांना अनेक आश्वासन दिले होती. त्यातील कोणतेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. उलट निर्यात बंदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या अनुषंगाने आम्ही पोलिसांत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र भाजपकडून(BJP) दडपशाही केली जात आहे लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन देखील मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे, अशी नाराजी व्यक्त केली.

Dindori Thackeray group leader
Dindori Lok Sabha: मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे यांच्या हस्तक्षेपाने दिंडोरीची यंत्रणा गतिमान

दरम्यान निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार कदम आणि सायखेडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी निफाड तालुक्यात आंदोलन करण्याची शक्यता असलेल्या शेतकरी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले आहे. दिंडोरी तसेच नाशिक मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com