Class 12 marks issue : देशात NEET पेपरफुटीवरून खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे. पेपरफुटीवरून गदारोळ सुरू असतानाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरून वाद निर्माण झाला आहे.
इयत्ता बारावी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्यानंतर सीबीएसईने नव्याने आणलेल्या उत्तरपत्रिका तपासणी पध्दतीवर आक्षेप घेतला आहे. सीबीएसईकडून ऑन-स्क्रीन मार्किंग या तंत्रज्ञानावर आधारित पध्दतीचा वापर करून उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर खुद्द केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांना समोर येऊन खुलासा करावा लागला आहे.
संजय कुमार यांनी सांगितले की, काही विद्यार्थ्यांना आपल्याला आणखी चांगले गुण मिळायला हवे होते, असे वाटत आहे. ओएसएम ही पध्दत पहिल्यांदा २०२४ मध्ये लागू करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मुंबई, दिल्ली विद्यापीठासह परदेशातही या पध्दतीचा वापर केला जातो. बोर्ड डिजिटल पध्दचीच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा सांभाळण्यासाठी सक्षम आहे.
गुणांकन प्रक्रियेत अधिका पारदर्शकता, सातत्य आणि सुरक्षितता आणण्यासाठी OSM पध्दतीचा वापर केला जात असल्याचे संजय कुमार यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून सुमारे ९८ लाख ६६ हजार उत्तरपत्रिका स्कॅन करून त्याचे पीडीएफ करण्यात आले. कोणत्याही तांत्रिक चुका राहू नयेत, यासाठी तीन स्तरावर तपासणी झाली. शाईमुळे धुसर झालेले अक्षर आणि स्कॅनिंगच्या काही समस्यांमुळे सुमारे १३ हजार उत्तर पत्रिकांची शिक्षकांमार्फत पुन्हा तपासणी करण्यात आल्याचेही संजय कुमार यांनी सांगितले.
शुल्कात कपात
विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिका पाहायची असल्यास ते अर्ज करू शकतात. त्यासाठीचे शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यासाठी आता केवळ १०० रुपये आकारले जाणार आहेत. पूर्वी हे शुल्क ७०० रुपये एवढे होते. त्याचप्रमाणे उत्तरांची पुनर्तपासणी करण्यासाठी एका प्रश्नाला २५ रुपये शुल्क असेल. तपासणीत गुण वाढल्यास शुल्क परत केले जाईल. ही प्रक्रिया १९ मेपासून सुरू होमार असल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.