Pune road accident : ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाच्या फॉर्च्युनरची रिक्षाला जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

Prakash Bhegade accident, Shiv Sena leader injured : नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत फॉर्च्युनरमधील जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
Mulshi accident news
Mulshi accident newsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याच्या मुळशी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मुळशीतील चांदे-मूलखेड रस्त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या फॉर्च्युनर गाडीची आणि एका रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर शिवसेना नेते प्रकाश भेगडे यांच्यासह फॉर्च्युनरमधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, चांदे-मूलखेड रस्त्यावरून जात असताना प्रकाश भेगडे यांच्या फॉर्च्युनर गाडीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, रिक्षाचालक विकास अर्जुन पारखी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात फॉर्च्युनर गाडीचेही मोठे नुकसान झाले असून, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासोबत गाडीत असलेले इतर कार्यकर्तेही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mulshi accident news
Pawan Kalyan : आंध्र प्रदेशच्या राजकारणात चलबिचल; भाजप, चंद्राबाबूंसोबतच्या आघाडीवरून पवन कल्याण यांच्या पक्षात नाराजी, कार्यकर्ते थेटच बोलू लागले...

स्थानिकांची मदतीसाठी धाव

अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत फॉर्च्युनरमधील जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mulshi accident news
खासदारकीचा राजीनामा देत एकही आमदार नसलेल्या पक्षात प्रवेश, आता जोरदार धक्का

फॉर्च्युनर चालकावर गुन्हा दाखल

या दुर्दैवी घटनेनंतर मृत रिक्षाचालकाचे नातेवाईक अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुळशीतील पौड पोलीस ठाण्यात फॉर्च्युनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघात नेमका कसा झाला, गाडीचा वेग किती होता, या संदर्भातील पुढील तपास पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com