Liquor Sarkarnama
देश

Liquor Price Drop: मद्यप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी: केंद्र सरकारचे दोन मोठे करार, ब्रँडेड स्कॉच,आयरिश व्हिस्की स्वस्त होणार

Alcohol Prices : केंद्र सरकारने दोन करार केल्यामुळे परदेशी ब्रँडेड मद्य आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सरकारनं 27 जानेवारी व 7 फेब्रुवारीला युरोपियन यूनियनसह 27 जानेवारी तर अमेरिकेसोबत 7 फेब्रुवारीला दोन ऐतिहासिक करार केले आहेत.

Deepak Kulkarni

New Delhi News: भारतानं जागतिक व्यापार क्षेत्रात दोन मोठे निर्णय घेतले आहेत. या महत्वाच्या निर्णयांमुळे देशातील मद्यप्रेमी आणि बार व्यावसायिकांसाठी दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं युरोपियन युनियन (EU)आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या बाजारपेठांशी ऐतिहासिक व्यापार केलेले आहेत.

केंद्र सरकारने केलेल्या करारामुळे परदेशी ब्रँडेड मद्य आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परदेशी ब्रँडेड मद्य आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सरकारनं 27 जानेवारी व 7 फेब्रुवारीला युरोपियन यूनियनसह  27 जानेवारी तर अमेरिकेसोबत 7 फेब्रुवारीला दोन ऐतिहासिक करार केले आहेत. यामुळे मद्य आता 40 टक्क्यांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे.

परदेशी मद्यावरील आयात शुल्क कमी झाल्यामुळे भारतात राष्ट्रीय दर्जाच्या मद्य व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. सरकारच्या दोन मोठ्या करारांमुळे परदेशी ब्रँडेड मद्य स्वस्त हा निर्णय ग्राहकांसाठी चांगला असला तरी भारतीय मद्य निर्मिती क्षेत्रासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. स्कॉच आणि आयरिश व्हिस्की यांसह अमेरिकन 'बोर्बोन' व्हिस्की आता भारतीय बारमध्ये मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे स्कॉच किंवा बोर्बोन हे ब्रँड दुबई सिंगापूरमध्ये स्वस्तात उपलब्ध असताना भारतात मात्र प्रचंड महाग मिळत होते. यापाठीमागं त्यावर 166% आयात शुल्क लागू करण्यात येत होतं. पण आता सरकारच्या दोन नव्या करारांमुळे हे शुल्क 30% ते 40% पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. दिल्लीसह देशभरातल्या मद्य मार्केटमध्ये दर कमी झालेले दिसणार आहे.

केंद्र सरकारच्या युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या दोन ऐतिहासिक करारांमुळे भारतीय मद्य निर्मिती क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांचा थेट जागतिक दर्जाच्या ब्रँड्सशी सामना करावा लागणार आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार्या दरात जर परदेशी ब्रँडेड मद्य उपलब्ध होत असताना भारतीय मद्य निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसमोर आपला दर्जा राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT