Malegaon Accident: मालेगाव महापालिकेत महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक संपताच भीषण दुर्घटना; चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली

Malegaon Mahapalika News: मालेगाव महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर इमारतीत मोठा अपघात घडला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला.
malegaon mahanagarpalika Accident
malegaon mahanagarpalika Accident Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 84 जागांपैकी 35 जागा जिंकत इस्लाम पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर एमआयएमला 21, शिवसेनेला 18 , समाजवादी पक्षाला 5, काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या. यानंतर शनिवारी (ता.7) मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर काहीच वेळात एक भीषण घटना घडल्याचं समोर आलं होतं.

मालेगाव महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर इमारतीत मोठा अपघात घडला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला. या अपघातात नशीब बलवत्तर म्हणून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचं मागणं कारण समोर आलं आहे.

महापालिकेच्या इमारतीच्या या लिफ्टमध्ये एकूण 18 नागरिक होते. याचदरम्यान, चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. पण थेट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावरच लिफ्टचा दरवाजा अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली. यामुळे लिफ्टमधील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

मालेगाव महानगरपालिकेतील या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणासह प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची बाहेर काढण्यात आलं.

malegaon mahanagarpalika Accident
BJP Mumbai Mayor : उद्धव ठाकरेंनी भाजपचा पैरा फेडला; मुंबईच्या महापौर निवडणुकीत माघार, रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित

महानगरपालिकेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही लिफ्ट कोसळण्याची दुर्घटना घडल्यानं नागरिकांसह राजकीय नेत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. या अपघातावेळी लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीच्या नेतेमंडळींसह काही नगरसेवक,पत्रकारही अडकल्याची माहिती समोर येत आहे.

महानगरपालिकेच्याअसून लिफ्टची चैन तुटल्यामुळे आणि लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मालेगाव महानगरपालिकेत मालेगाव सेक्युलर फ्रंटचा भाग असलेली इस्लाम पार्टीनं सर्वाधिक 35 जागा जिंकल्या आहेत. तर दोन नंबरचा पक्ष ठरलेल्या एमआयएमनं 21 जागा मिळवल्या आहेत.

malegaon mahanagarpalika Accident
मोदी सरकारचा महाराष्ट्रातील राजकारण्यांना दणका : जिल्हा बँकांमधील 'परमनंट संचालकांची' मक्तेदारी संपुष्टात; केंद्राकडून नवीन कायदा लागू

मालेगाव सेक्युलर फ्रंटचा भाग असलेल्या इस्लाम पार्टीचे उमेदवार नसरीन खालिद शेख यांची महापौरपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत शेख यांना सर्वात जास्त 43 मते मिळाली.काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी इस्लाम पार्टीच्या शेख यांनाच आपलं मतदान केलं. महापौर म्हणून त्यांच्या नावाची घोषित करण्यात आली.

तर शिवसेनेच्या उमेदवाराला 18 मतं मिळाली आणि त्यांचा पराभव झाला. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमचे सर्वच्या सर्व आणि भाजपचे निवडून आलेले दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं.

malegaon mahanagarpalika Accident
Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचं स्टिअरिंग तटकरे-पटेलांकडे? प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं भाजपचा ‘गेमप्लॅन’ उघड!

तर दुसरीकडे मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नीलेश काकडे यांना पराभवाचा धक्का दिला. शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 43 मते तर शिवसेनेच्या काकडेंना 18 मतं मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com