Rahul Navin, PM Narendra Modi Sarkarnama
देश

Modi Government : ‘ईडी’च्या संचालकांना मोदी सरकारकडून बक्षीस; थेट दिलं अतिरिक्त सचिवपद

Rajanand More

ED News : मागील काही वर्षांपासून राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहिलेल्या सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या संचालकांना केंद्र सरकारने बक्षीस दिले आहे. ईडीचे संचालक राहुल नवीन यांची रँक अपग्रेड करण्यात आली असून आता ते केंद्र सरकारच्या सेवेत अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी असतील. नवीन यांच्यासह एकूण 11 अधिकाऱ्यांची रँक अपग्रेड करण्यात आली आहे.

नवीन (Rahul Navin) यांची ईडीच्या (ED) प्रभारी संचालकपदी सप्टेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय महसूलसेवेतील 1993 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. संजयकुमार मिश्रा (SanjayKumar Mishra) यांची मुदत संपल्यानंतर नवीन यांच्यावर 15 सप्टेंबर रोजी ही जबाबदारी सोपवण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने 11 अधिकाऱ्यांची रँक अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना अतिरिक्त सचिवपदाचा दर्जा देण्यात आला असून त्या पदाचे वेतन मिळेल, असे केंद्र सरकारच्या आदेशात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल नवीन यांच्याप्रमाणेच शुभा ठाकूर, संजुक्ता मुदगल, अनंत स्वरुप, नवलजित कपूर, मनोज पांडे, अनुराग वाजपेयी, आलोक पांडे, सुनील कुमार, हनिफ कुरेशी आणि आनंदराव विष्णू पाटील यांची रँकही अपग्रेड करण्यात आली आहे.

दरम्यान, राहुल नवीन हे आज पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) असून अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा आढावा घेत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी छापेमारी करायला गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यांची वाहनेही फोडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नवीन यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT