Kangana Ranaut : भाजपची समर्थक असल्याने ‘जिओ’ दारात उभं करेना; कंगनाने खळबळ उडवून दिली...

Jio Cinema : जिओ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म असून प्रॉडक्शन हाऊसही आहे...
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. कंगनाला बिल्किस बानो यांच्यावर चित्रपट तयार करायचा आहे. पण ‘जिओ सिनेमा’कडून तिला नकार देण्यात आला आहे. भाजपची समर्थक असल्याने जिओ सिनेमाने नकार दिल्याचा दावा कंगनाकडून करण्यात आला आहे.

कंगनाने (Kangana Ranaut) याबाबत ट्विट करून खुलासा केला आहे. एका चाहत्याकडून बिल्किस बानो यांच्या आयुष्यावर कंगना यांनी चित्रपट बनवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना कंगनाने ट्विटरवर केलेल्या धक्कादायक विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण भाजपची (BJP) समर्थक असल्याने जिओ सिनेमाकडून (Jio Cinema) नकार देण्यात आल्याचे तिने स्पष्टपणे म्हटले आहे.

Kangana Ranaut
West Bengal News : ममतांच्या गडात होणार मोठी कारवाई? ‘ईडी’ संचालकांनी रातोरात गाठलं बंगाल...

गुजरात (Gujarat) दंगलीत 2002 मध्ये बिल्किस बानो (Bilkis Bano) यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणात जन्मठेप झालेल्या 11 आरोपींना गुजरात सरकारने 2022 मध्ये तुरुंगातून सोडले होते. सोमवारीच सुप्रीम कोर्टाने (Supreme court) हा निर्णय रद्द केला. त्यानंतर आज कंगनाने या प्रकरणावर चित्रपट बनविण्यासाठी आपण तयार असल्याचे म्हणत स्क्रीप्ट तयार असल्याचेही सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘तीन वर्षांपासून यावर काम करीत आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, अमेझॉनकडून कथित राजकीयदृष्ट्या प्रेरित चित्रपट करीत नसल्याचे सांगितले, तर जिओ सिनेमाने म्हटले की, कंगनासोबत काम करीत नाही, कारण ती भाजपचे समर्थन करते आणि झी विलीनीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाही,’ असे कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने जिओ सिनेमाच्या भूमिकेवर खुलासा करणारे आणखी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांच्या फिल्म कंटेंट हेड शोभना संत यांनी माझ्या निर्मात्यांना अभिनेत्री बदलायला सांगितले. तसे झाले तर लगेच प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवू, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या सीईओलाही भेटले.

त्यानंतर मागील आठवड्यात शोभना संत यांनी माझ्या निर्मात्यांना सांगितले की, कंगनाने भाजपचे समर्थन करू नये किंवा निवडणूकही लढवू नये. तिने तसे लेखी दिले तर आपण पुढे जाऊ, असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

R...

Kangana Ranaut
Tamil Nadu Politics : मुख्यमंत्री स्टॅलिन मोठा निर्णय घेणार; मुलगा उदयनिधी बनणार उपमुख्यमंत्री?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com